डेटा मायनिंग आणि इन्फर्मेशन सिक्युरिटी' विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे उदघाटन* 

प्रेस नोट 
*'डेटा मायनिंग आणि इन्फर्मेशन सिक्युरिटी' विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे उदघाटन*
पुणे :
 भारती विद्यापीठाच्या 'इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट'(आयएमईडी) आयोजित 'इमर्जिंग ट्रेंड्स,चॅलेंजेस,अपॉर्च्युनिटीज इन डेटा मायनिंग आणि इन्फर्मेशन सिक्युरिटी' या विषयावरील 'एन टी कॉमीस -२०२०' या राष्ट्रीय परिषदेचे उदघाटन १७ जानेवारी रोजी एरंडवणे कॅम्पस मध्ये झाले. विन्सीस इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी प्रा.लि.चे उपाध्यक्ष अमित आंद्रे,पर्सिस्टंट सिस्टिम्सचे वरिष्ठ अधिकारी माताप्रसाद आगरवाल,व्हेरिटास सॉफ्टवेअर प्रा.लि.चे वरिष्ठ व्यवस्थापक संजय मुंद्रा,प्राजक्ता पवार यांच्याहस्ते परिषदेचे उदघाटन झाले. 
 'इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट' चे संचालक डॉ सचिन वेर्णेकर अध्यक्षस्थानी होते. मान्यवरांच्या हस्ते परिषदेच्या संशोधन पत्रिकेचे प्रकाशन झाले.परिषदेच्या निमंत्रक डॉ.बलजित कौर, यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.देशातून दिल्ली,राजस्थान,हैदराबाद अशा अनेक ठिकाणाहून ६० प्रतिनिधी,प्राध्यापक,संशोधक आणि विद्यार्थी या परिषदेला उपस्थित आहेत.'डेटा मायनिंग आणि इन्फर्मेशन सिक्युरिटी' विषयातील बदलत्या प्रवाह आणि आव्हानविषयक अनेक सादरीकरणे झाली आणि संशोधनपर निबंध सादर करण्यात आले. एमसीए विभागप्रमुख डॉ अजित मोरे आणि संयोजन समितीच्या सदस्यांनी परिषद यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. 
---------------------------