आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागातर्फे नैमित्तिक करारावरील ‘हंगामी वृत्त संपादक/वार्ताहर’या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत

निवेदन 1
आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागातर्फे नैमित्तिक करारावरील ‘हंगामी वृत्त संपादक/वार्ताहर’या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. निवड झालेल्या उमेदवारांची तालिका करुन त्यांना वृत्त विभागाच्या गरजेनुसार काम देण्यात येईल. त्याकरता उमेदवाराची शैक्षणिक आणि इतर पात्रता पुढीलप्रमाणे आहे.


शैक्षणिक पात्रता
1.कोणत्याही शाखेतली मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
2. वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन या विषयातली पदवी किंवा पदव्युत्तर पदविका
3.मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवर प्रभुत्व आवश्यक


इतर पात्रता
1.    वयोमर्यादा – 21 ते 50
2.    संगणक हाताळणीचं प्राथमिक ज्ञान.
3.    उमेदवार पुणे शहर आणि परिसरात राहाणारा असावा


अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे


1.पूर्ण वैयक्तिक माहिती (पत्ता, ई-मेल / दूरध्वनी क्रमांक अत्यावश्यक)
2. अलिकडच्या काळातले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
3. वय, शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता आणि अनुभव असल्यास त्याबाबतच्या प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स
4. विहीत नमुन्यातील अर्जात नमुद केलेल्या सुचनेनुसार प्रवेश शुल्क ऑनलाईन जमा करायाचे आहेत. (शुल्क रु 354/- खुला प्रवर्ग, शुल्क रु 266/- अजा/अज/इमाव)


विहीत नमुन्यातील अर्ज खालील पत्त्यावर उपलब्ध होऊ शकतील. तसेच हे अर्ज आमच्या  http://newsonair.com/marathi/Marathi या वेबसाईटवरुन ही डाऊनलोड करता येतील. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी, 2020 असून अर्ज खालील पत्त्यावर पाठवावेत. अर्जाच्या पाकीटावर ‘हंगामी वृत्त संपादक/वार्ताहर या पदासाठी असा उल्लेख करणं आवश्यक आहे.



उप संचालक
प्रादेशिक वृत्त विभाग
आकाशवाणी पुणे
शिवाजीनगर, पुणे -411005
अधिक माहितीसाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या – http://newsonair.com/marathi/Marathi


संपर्क साधा
ई-मेल पत्ता arnupune@gmail.com
दूरध्वनी – 020-25510506


 


 


 


 



निवेदन 2


आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागातर्फे नैमित्तिक करारावरील ‘हंगामी वृत्तनिवेदक तथा भाषांतरकार’ या पदासाठी अर्ज मागवत आहे. निवड झालेल्या उमेदवारांची तालिका करुन त्यांना वृत्त विभागाच्या गरजेनुसार काम देण्यात येईल. त्याकरता उमेदवाराची शैक्षणिक आणि इतर पात्रता खालीलप्रमाणे आहे.


शैक्षणिक पात्रता
1. कोणत्याही शाखेतली मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
(वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन या विषयातली पदवी किंवा पदविका, तसंच पत्रकारिता आणि आवाजाच्या क्षेत्रातला अनुभव असल्यास प्राधान्य)
2. महाराष्ट्राची राजकीय, सांस्कृतिक, भौगोलिक माहिती असणे आवश्यक.
3. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा या तिन्ही भाषांचं उत्तम ज्ञान असणं आवश्यक.


इतर पात्रता
1. वयोमर्यादा- 50 वर्षे (कमाल)
2. संगणक हाताळणीचं प्राथमिक ज्ञान.
3. उमेदवार पुणे शहर आणि परिसरात राहाणारा असावा


अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे
1.पूर्ण वैयक्तिक माहिती (पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ईमेल अत्यावश्यक)
2. अलिकडच्या काळातले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
3. वय, शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता असल्यास त्याबाबतच्या प्रमाणपत्रांच्या झेरॉक्स
4. विहीत नमुन्यातील अर्जात नमुद केलेल्या सुचनेनुसार प्रवेश शुल्क ऑनलाईन जमा करायाचे आहेत. (शुल्क रु 354/- खुला प्रवर्ग, शुल्क रु 266/- अजा/अज/इमाव)


विहीत नमुन्यातील अर्ज खालील पत्त्यावर उपलब्ध होऊ शकतील. तसेच हे अर्ज आमच्या  http://newsonair.com/marathi/Marathi या वेबसाईटवरुन ही डाऊनलोड करता येतील. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी, 2020 असून अर्ज खालील पत्त्यावर पाठवावेत. अर्जाच्या पाकीटावर ‘हंगामी वृत्तनिवेदक तथा भाषांतरकार’ या पदासाठी असा उल्लेख करणं आवश्यक आहे.


उप संचालक
प्रादेशिक वृत्त विभाग
आकाशवाणी पुणे
शिवाजीनगर
पुणे - 411005
अधिक माहितीसाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या – http://newsonair.com/marathi/Marathi


संपर्क साधा
ई-मेल पत्ता arnupune@gmail.com
दूरध्वनी – 020-25510506