*'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी ' पुस्तक विकल्यास स्टॉल जाळू: संजय आल्हाट यांचा इशारा*

प्रेस नोट 


*'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी ' पुस्तक विकल्यास स्टॉल जाळू: संजय आल्हाट यांचा इशारा*



पुणे:


  मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर करणे ही भाजप कार्यकर्त्यांची घोडचूक असून हे पुस्तक विकणारा स्टॉल आढळल्यास स्टॉल जाळून टाकू असा इशारा रामविलास पासवान यांच्या'लोकजनशक्ती पार्टी 'चे पुणे शहर जिल्हाध्यक्ष संजय अल्हाट यांनी दिला.


 आज प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात अल्हाट यांनी हा इशारा दिला आहे." छत्रपती शिवाजी महाराजांसारखे व्यक्तिमत्व युगा युगातून एकदाच जन्माला येते. त्यांच्याशी तुलना करण्याचा प्रयत्न मोदी समर्थकांनी करू नये. कार्यकर्त्यांची ही घोडचूक खपवून घेतली जाणार नाही. हे पुस्तक ज्या स्टॉलवर दिसेल, तो स्टॉल जाळून टाकण्यात येईल, असा इशारा संजय  आल्हाट यांनी दिला आहे.


 या पत्रकावर महाराष्ट्र सरचिटणीस अशोक कांबळे, प्रसाद शेलार ,दीपक भडके, राहुल उभे, सविता रणदिवे, रजिया खान यांच्या सह्या आहेत.



..............................................