*प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने*
26 नोव्हेंबर 1949 रोजी भारत देशाने संविधानाचा स्वीकार केला.
26 जानेवारी 1950 रोजी भारत देशात डॉ. बाबासाहेब आंबडकरांनी लिहिलेले संविधान लागू झाले. आणि भारतातील गोरगरीब सर्व सामान्य जनतेला शिक्षणाचा , नोकरीचा म्हणजेच स्वविकासाचा अधिकार मिळाला. मताचा अधिकार मिळाला. ग्रामपंचायतीचा सरपंच निवडण्याचा, तालुक्याचा आमदार, खासदार, राज्याचा मुख्यमंत्री, देशाचा प्रधानमंत्री निवडण्याचा अधिकार जनतेला मिळाला. गरीब असो वा श्रीमंत ,शिक्षित असो असो की अशिक्षित ,कोणत्याही धर्माचा असो की जातीचा......सर्वांना भारताचा नागरिक म्हणून एक मताचा अधिकार मिळाला . जगाने मान्य केलेला मानवतावादी समतेचा पहिला पाया येथे रचला गेला . हे महान सविंधान लिहिण्यास डॉ. बाबासाहेबाना 2 वर्ष, 11 महिने 18 दिवस लागले.या कालावधी सतत 20 ते 22 तास दररोज संविधान निर्मितीचे काम करीत होते .कारण तसे केले नसते तर या कार्यास किमान नऊ वर्षे लागतील असा त्यावेळी सर्व राष्ट्रीय नेत्यांनी कयास व्यक्त केला होता .
जगात गौरविले जाणारे हे महान संविधान निर्माण करतांना डॉ. बाबासाहेबांनी आपल्या तब्येतीची जराही चिंता केली नाही.रात्रंदिवस काम करीत राहिले .त्यामुळे त्यांच्या तब्येतीवर फार परिणाम झाला .पण त्यांनी कशाचीही फिकीर केली नाही .हे संविधान निर्मिती करून,त्यास सर संसदेची मंजुरी मिळवून ते देशाला समर्पित करणे हे डॉ. बाबासाहेबांचे महान उपकार भारत देशावर आहेत.
या संविधानाचे महत्त्व समजून घ्यायचे असेल तर संविधानाचे वाचन करणे, त्या मध्ये लिहिलेली अधिकार व कर्तव्ये जाणून घेणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आपले जीवन सुखी, व समृद्ध करायचे असेल तर संविधानात समावेश केलेले. समता, स्वतंत्र ,बंधुत्व याचे आचरण,आपल्या कुठुंबात, समाजात, ज्या ज्या ठिकाणी आपला वावर आहे त्या ठिकणापासून केल्यास आपले कुटूंब, आपला समाज, पर्यायाने आपला देश प्रगतीपथावर जाईल यात शंका नाही.त्यासाठी या तत्त्वांचा खरा अर्थ व महत्त्व समजून घेण्याची प्रत्येक भारतीयाला गरज आहे .आणि त्याकरिता सर्वांना भारतीय बनण्याची गरज आहे .म्हणून , " मी सर्वात प्रथम भारतीय आहे आणि सर्वात शेवटी भारतीयच आहे " ही भूमिका सर्व देशाने म्हणजे नागरिकांनी घ्यावी अशी त्यांची ठाम भूमिका होती .
त्यासाठी भारताचे संविधान चिरायु होवो. डॉ. बाबासाहेब आंबडकरांनी पाहिलेले स्वातंत्र्य,समता,बंधुता व न्याय यावर आधारित असलेल्या बल शाही भारताचे स्वप्न साकार होवो..........या सदीच्छेसह सर्व भारतीयांना प्रजासत्ताकाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
साप्ताहिक पुणे प्रवाह परिवाराकडून
समस्त भारतीयांना
७१ व्या गणतंत्र - प्रजासत्ताक दिनाच्या
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा
२६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिन चिरायू व्होवो
जय भारत ...जय महाराष्ट्र...... जयहिंद.