संशोधनातून उलगडतेय अंतराळातील जीवन : पंडित विद्यासागर

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


संशोधनातून उलगडतेय अंतराळातील जीवन : पंडित विद्यासागर


राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त मराठी विज्ञान परिषद व महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे 'अंतराळातील जीवन'वर व्याख्यान


पुणे : "जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी तंत्रज्ञान आणि संवाद शास्त्र अधिकाधिक विकसित होण्यासाठी अवकाश संशोधनावावर प्रत्येक देश भर देत असून, त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करताहेत. अनेक अवकाश मोहीमा घेतल्या जाताहेत. परंतु, अवकाशात गेल्यानंतर मानवाच्या मेंदूसह, शारीरिक, मानसिक प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे अनेक आजार उद्भवतात. जगातील सर्व वैज्ञानिक त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयोग करत आहेत. भविष्यात कमीतकमी त्रास होईल, यासाठी प्रयत्न सुरु आहेत," असे प्रतिपादन नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले. लोकांची जिज्ञासा उलगडणे आणि तेथील एखादे तंत्रज्ञान आपल्या जीवनात अंमलात आणता येते का, याचा उलगडा करण्यासाठी या अवकाश मोहिमा उपयुक्त ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले.


राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त मराठी विज्ञान परिषद व महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने टिळक रस्त्यावरील साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात 'अंतराळातील जीवन' या विषयावरील आयोजित व्याख्यानात डॉ. विद्यासागर बोलत होते. प्रसंगी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ, ज्येष्ठ सदस्य विनय र र, नीलिमा राजूरकर, नीता शहा, डॉ सुजाता बरगाले, शशी भाटे अंजली देसाई, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रकाश पायगुडे आदी उपस्थित होते.


प्रा. डॉ. विद्यासागर पंडित म्हणाले, "रशियाने पहिल्यांदा अवकाशात मानव पाठवला आणि अनेक गोष्टींचा उलगडला केला. यामुळे महासत्ता असलेल्या अमेरिकालाही खंत होती. आपण हे प्रयोग करू शकलो नाही. त्यामुळे त्यांनी 9 वर्षात तयारी करत चंद्रावर मानव पाठवला. त्यानंतर प्रत्येक देश अवकाश मोहीम राबवू लागला. पहिल्यांदा प्राण्यांवर प्रयोग करून त्यांच्या शरीरावर काय बदल होतात ते पहिले आणि त्यानंतर मानवाच्या शरीरावर परिणाम होऊ नये यासाठी बदल केले गेले. प्राण्यांबरोबर वनस्पतींनाही गुरुत्वाकर्षण कळते. काही वर्षात पृथ्वी राहण्यायोग्य असणार नाही. त्यासाठी प्रत्येक देश दुसऱ्या ग्रहावर राहण्यासाठी अनुकूल परिस्थिती पाहत आहे. परंतु असे न करता पृथ्वीचे आयुष्य कसे वाढेल, यासाठी मानवाने प्रयत्न करणे गरजेचे आहे."


राजेंद्र सराफ म्हणाले, "साहित्य आणि विज्ञान यांच्या मिलाफातून अभ्यास व्हायला हवा. विज्ञान परिषद आणि साहित्य परिषद यांच्या एकत्रित प्रयत्नातून सकस असे विज्ञान साहित्य निर्मिले जात आहे." विनय र. र. यांनी प्रास्ताविकात मराठी विज्ञान परिषदेच्या उपक्रमांचा आढावा घेतला. सूत्रसंचालन अंजली देसाई यांनी केले. प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*