*पार्थ पवार फाउंडेशनकडून माणुसकीचा हात..*  *गरजूंना अन्नदान .

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*पार्थ पवार फाउंडेशनकडून माणुसकीचा हात..* 
*गरजूंना अन्नदान ..*


पिंपरी चिंचवड : सर्वत्र कोरोनाचे संकट पसरले असताना देशभर आपत्कालीन परिस्थिती आहे. अशा परिस्थितीतही अनेक सेवाभावी संस्था आता मदतीचा हात पुढे करू लागल्या आहेत. आज *पार्थ पवार फाउंडेशन* च्या माध्यमातून  गरजू गोरगरिबांना अन्नदान करण्यात आले. 


पार्थ पवार फाउंडेशनच्या माध्यमातून राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर  अध्यक्ष विशाल वकाडकर , प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस महाराष्ट्र, यावेळी सरकारच्या सर्व आदेशांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे आणि आपल्या व आपल्या कुटुंबीयांची काळजी घेण्याची विनंती यावेळी करण्यात आली..


फाउंडेशनच्या माध्यमातून दुपारी  गरजु बांधवांच्या  घरोघरी जाऊन गरजू व गोरगरिबांना अन्नदान करण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आपत्कालीन सेवेतील कर्मचारी वृंद, सेवा बजावत असणारे होमगार्ड व पोलीस बांधवांना ही अन्नदान वाटप करण्यात आले. हा अन्नदान उपक्रम लॉकडाऊनच्या संपूर्ण काळात पार्थ पवार फ़ाउंडेशनच्या मार्फ़त करण्यात येणार असल्याचे यावेळी विशाल वाकड़कर व विशाल काळभोर यांनी सांगितले रवी लिंभोरे , अभिमन्यु ज़मदाड़े , अजय जाधव , सचिन मोकाशी संघटक रा यु काॅं , दीपक महाराणा , विकास ठाणांबीर  उपाध्यक्ष प्रभाग क्र.१४ , संजय पोळ, संदीप महाराणा , तोफिक खान , यावेळी मित्र परिवाराचे मोलाचे सहकार्य लाभले..