जीना इसीका*,   . . . *नाम है*. . ! जिने असतात अबोल, पण खूप काही सांगणारे  . . . प्रगतीचा आलेख, पायरीपायरीने उंचावतो,कोसळताना मात्र,  छोटे निमित्त पुरते . . .

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*जीना इसीका*,
  . . . *नाम है*. . !
जिने असतात अबोल, पण खूप काही सांगणारे  . . .
प्रगतीचा आलेख, पायरीपायरीने उंचावतो,कोसळताना मात्र,  छोटे निमित्त पुरते . . .
जिने अबोल असतात, पण  . . 


जिन्याची सुरवात, जमिनीशी नाते सांगणारी, ऊंचीवर नेऊन, दूरदृष्टी देणारी ! 
आकाश आणि जमिनीचा दु(रा)वा ठरणारे  . . .
जिने असतात अबोल  . . . 


जिन्याला असतात भक्कम पाय-या, आधारासाठी नक्षीदार कठडे, आंणि उतरण सुद्धा सुकर, मात्र अनेकांना याचाच विसर  ! 
जिने असतात अबोल  . . . 


जीर्ण इमारतीचा जिना,मोडकळीस असतो, नक्षी तुटून जाते, आधाराचे हात दुरावतात,अगदी निराधार वृद्धासारखे !
जिने अबोल असतात  पण . . .


जिना असतो हवेलीत, राजमहालात ,जंगलात, द-याखो-यात सुद्धा  ! गरीबाच्या खोपटात मात्र  . . .
जिना असतो अबोल  पण  . . 


जिना मातीचा, घडीव कातळाचा, नक्षीदार काष्ठाचा, वास्तू सौंदर्याचा आधार . . .रूप जरी वेगळे तरी,चढउताराचा साक्षीदार  ! 
जिना असतो अबोल पण  . . . 


 अनेकांना प्रगतीसाठी, फक्त शिडी हवी असते, इथे जिना ठरतो अडगळ.  . .दूर करता येत नाही  !
जिना असतो अबोल पण  . . 


अत्युच्च स्थानी पोचायला, अनेकांना  
'लिफ्ट' हवी असते, मात्र जिन्याची चढण मंद असली तरी दमदार असते  !
जिना असतो अबोल पण  . . 


   युगे उलटली तरी निवा-याची गरज, कालातीत आहे. प्रगतीचे आयाम वेगळे तरी जगण्याची लय आंणि टप्पा ,अपरिहार्य आहे.  . . 
जिना असतो अबोल पण  . . . 


काही जिने ईश्वरी, आशेचा अंकूर रुजवणारे, जगण्याचा सुगंध आणि निराकारातील ओंकार  !
जिना असतो अबोल पण.  . .


जिना आणि जीना, फरक फक्त भाषेचा, -हस्व दीर्घ वेलांटीचा, चढ उतारांच्या आलेखाचा  !
जिना असतो अबोल पण  . . . 
  *आनंद सराफ*