छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज नेरळ मध्ये सार्वजनिक स्वरूपात साजरी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज नेरळ मध्ये सार्वजनिक स्वरूपात साजरी होत असून तिथिप्रमाणे शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते. नेरळ येथील शिवदौड समितीच्या वतीने सलग पाचव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांवरून शिवदौड ज्योत आणली जाते आणि यावर्षी किल्ले सिंहगड येथून पायी दौडत निघालेल्या शिवदौड चे जोरदार स्वागत नेरळकरांनी केले. 

                     छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नेरळ गावातील तरुण दरवर्षी शिवाजी महाराजा यांच्या किल्ल्यावरून शिवज्योत घेऊन येत असतात. यावर्षी सलग पाचव्या वर्षी शिवज्योत पुणे जिल्ह्यातील किल्ले सिंहगड येथून आली. 145 किलोमीटर अंतर दोन दिवसात रात्री पार करून सहभागी 27 तरुण नेरळ गावात आज सकाळी दहा वाजता पोहचाल. त्यावेळी नेरळ सार्वजनिक शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने या शोवदौड ज्योतीचे स्वागत छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले.त्यावेळी या वर्षीच्या उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून दर्शन दीपक मोडक, उपाध्यक्ष कल्पेश देशमुख, ऋषिकेश पाटील, सचिव सूरज साळवी,सहसचिव प्रसाद शिंदे,पराग कराळे, खजिनदार अजिंक्य मनवे,सह खजिनदार उदय मोडक यांनी स्वागत केले.त्यावेळी शिवसेनेचे नेरळ शहर प्रमुख रोहिदास मोरे,उपतालुका प्रमुख अंकुश दाभणे,नेरळ ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच अंकुश शेळके,टॅक्सी संघटनेचे माजी अध्यक्ष संतोष शेळके यांच्यसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 

                              यापूर्वी  स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड त्यांचवेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेले किल्ले शिवनेरी,त्यानंतर किल्ले प्रतापगड आणि गतवर्षी स्वामी रामदास यांचे पावलांनी पावन झालेले केली सज्जन गाद येथून शिवदौड आणण्यात आली होती. आज नेरळ येथील शिवाजी महाराज चौकात केली सिंहगड येथून शिवदौड घेऊन येणारे तरुण यांचे स्वागत हलगी च्या तालावर करण्यात आले. त्यावेळी शिवदौड घेऊन तब्बल 145 किलोमीटर चा प्रवास करून आलेले तरुण देखील हलगीच्या तालावर नाचू लागले होते/. शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आणि अन्य पदाधिकारी यांनी शिवदौड घेऊन येणारे तरुण यांचे भगवी शाल घालून कौतुक केले. 145  किलोमीटर चे अंतर धावत पार करणारे तरुण यात श्याम कडव आणि प्रथमेश कर्णिक यांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम सुरु केला आहे. त्या अन्य तरुणांमध्ये राहुल साळुंके,सुदर्शन भोईर,वेदांत शिंदे,कल्पेश म्हसे,प्रतीक वाघकर,


निलेश ठोंबरे,संदेश मोहिते,किरण भोईर,राजेश हाबळे,चिन्मय पवार,भूषण भोईर,प्रथमेश देशमुख,कुणाल कांबरी,जीवन भोईर,निखिल खडे,धनंजय भोईर,वैभव कांबरी,रुपेश चव्हाण,तुषार भोईर,संतोष राठोड,निखिल धुळे आदी सहभागी झाले होते.