पुणे प्रवाह न्युज पोर्टल
एप्रिल महिन्यात होणारा पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सव लांबणीवर
१७ मार्च
सध्या भेडसावत असलेल्या जागतिक संसर्ग कोरोना (कोविड -१९) च्या पार्श्वभूमीवर शहरात १० एप्रिल २०२० रोजी होणार पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सव स्थगित करून काही कालावधी साठी पुढे ढकलण्यात आला आहे. लवकरच महोत्सवाच्या नवीन तारखा जाहीर करण्यात येतील. अशी माहिती फेस्टिवलचे डायरेक्टर रमेश होलबोले यांनी दिली.
ह्या वर्षी महोत्सवा मध्ये राष्ट्रीय आणि आंतरतराष्ट्रीय मिळून असे जवळपास ४०० लघु चित्रपट सहभागी झाले असून या महोत्सवासाठी आंतरराष्ट्रीय परीक्षक लाभले होते, परंतु, आंतरराष्ट्रीय स्तरावरील आणीबाणी मुळे आंतरराष्ट्रीय परीक्षक, या महोत्सवास उपस्थित राहू शकत नाहीत. तसेच, भारताच्या विविध राज्यातील कानाकोपऱ्यातून सिनेदिग्दर्शकांनी आपला सहभाग नोंदविलेला आहे. या वर्षीच्या महोत्सवाचे वैशिट्य म्हणजे पिंपरी चिंचवडवासीयांना " पिंपरी चिंचवड शोकेस" या अंतर्गत स्थानिक कलाकारांचे उत्कृष्ट लघु चित्रपट पहावयास मिळणार आहेत.
परंतु शासनाने काढलेल्या परीपत्रका नुसार व जगात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उपाय योजना म्हणून सर्वच सांस्कृतिक व शासकीय कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढे ढकलले आहे. त्याला अनुसरूनच काल झालेल्या पी.सी.एम.सी. फिल्म क्लबच्या मिटिंग मध्ये ह्या वर्षीचा महोत्सव पुढे ढकलण्याचे ठरवले आहे.
या वेळी फेस्टिव्हलचे डायरेक्टर रमेश होलबोले, पी.सी.एम.सी. फिल्म क्लबचे संचालक अविनाश कांबीकर व दत्ता गुंड, फेस्टिव्हलचे क्रिएटिव्ह डायरेक्टर हर्षवर्धन धुतुरे व फेस्टिव्हलचे प्रमुख मार्गदर्शक पिंपरी चिंचवडचे सांस्कृतिक सल्लागार श्री.प्रवीणजी तुपे उपस्थित होते.