जागतिक महिला दिनानिमित्त रोटरी विज्डमच्या वतीने महिलांचा पुरस्कार देवून सत्कार.

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ पुणे विज्डमच्या वतीने महिलांचा व्होकेशनल एक्सलन्स-व्यावसायिक गुणवत्ता व सर्व्हिस एक्सलन्स –सेवा गुणवत्ता पुरस्कार देण्यात आला.विणा मोक्ताली(पेरिवींकल टेक्नॉलॉजी) यांना व्होकेशनल सर्व्हिस पुरस्कार तर जान्हवी जोशी व नुपुरा किर्लोस्कर(ब्ल्यु टेक इनोव्हेशन) यांना व्होकेशनल एक्सलन्स पुरस्कार प्रदान करण्यात आला.शाल,श्रीफल,पुष्पगुच्छ व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. गांधीभवन कोथरूड येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब विज्डमचे अध्यक्ष रो.अशोक लेले.सेक्रेटरी जान्हवी फडणीस,प्रमुख पाहुणे रूरल रिलेशनचे प्रदीप लोखंडे,महाराष्ट्र मेडीकल फाऊंडेशनचे डॉ.चंद्रशेखर कर्वे.कन्व्हेनर रो.रोहित फडणीस,आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी बोलताना प्रदीप लोखंडे यांनी देशाची प्रगति ही महिलांच्या हाती असल्याचे संगितले.वैशाली वर्णेकर यांनीकार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.  


छायाचित्र :पुरस्कारार्थी व मान्यवर.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*