*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
*भीम आर्मीचे टाळा ठोको आंदोलन*
पुणे दिनांक -
जनतेची आर्थिक पिळवणूक आणि आर्थिक लूट करणाऱ्या महावितरण प्रशासनाचा निषेध करण्यासाठी भीम आर्मीच्या वतीने महावितरणच्या मुख्य कार्यालय रास्ता पेठ येथे
टाळा ठो को आंदोलन करण्यात आले .यावेळी कार्यालयास टाळा ठोकून तीव्र निदर्शने करण्यात आली .यावेळी महावितरणच्या भोंगळ कार्याचा निषेध करण्यात आले.आंदोलनाचे नेतृत्व भीम आर्मीचे अध्यक्ष दत्ता पोळ यांनी केले.यावेळी दिल्लीच्या धर्तीवर 200 युनिट वीज मोफत देणे,चुकीचे बिले न काढणे ,थकीत बिले भरण्यासाठी तीन महिन्याची मदत द्यावी,विविध कारणाने ग्राहकाची फसवणूक तत्काळ थांबावी,मार्च एप्रिल काळात वीज तोड करू नये,वीज बिलवरील चक्रवाढ व्याज थांबवावं अशा विविध मागण्याचे निवेदन महवितरण चे मुख्य अभियंता यांना देण्यात आले .या वेळी महिला आणि युवक आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित होते
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*