पुणे प्रवाह न्युज पोर्टल
कृपया प्रसिद्धीकरिता,
सर्वेक्षणाचे काम सुरू,
नगररस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे वतीने नगररस्ता क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाय योजना अंतर्गत परिसरातील सुमारे ३९७ घरांना भेटी देण्यात आल्या,नागरिकांना कोरोना विषयक माहिती देताना,काय दक्षता घ्यावी, काय करावे,काय करू नये,मनपाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधा,वैद्यकीय सुविधा,तसेच काही लक्षणे दिसून येतात काय, उपचार कोणते, परदेश प्रवासी, अथवा आजारसदृश्य कोणी आहेत काय, अशा विविध महत्वपूर्ण बाबींची माहिती घेण्यात येउन मार्गदर्शन करण्यात आले,
विभागीय आरोग्य निरीक्षक शंकर जगताप यांचे अधिपत्याखाली पथकाने कामकाज केले,
पथकामध्ये आरोग्य निरीक्षक सचिन गवळी,ललिता तमनर,समीर खुळे, संदेश रोडे, मुकुंद घम, हनुमंत सावळी, शरद मरकड,श्रीमती सुषमा मुंढे,यांचा सहभाग होता,
पुणे मनपाच्या सणस मैदान येथील वसतिगृहात मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या,त्याचबरोबर वसतिगृहातील खोल्यामधून मूलभूत सुविधांसह दूरचित्रवाणी संच व गरम पाण्याकरिता गिझर बसविण्यात आले,
विविध कामकाज नियोजन व अंमलबजावणीकरिता तातडीने अधिकारी,कर्मचाऱयांच्या जबाबदारी निश्चित करून नियुक्त्या करण्यात आल्या,
जनजागृती करिता माहितीपत्रके,जाहिरात फलक, लावनेस तातडीने सुरवात करण्यात आलेली आहे,
--संजय मोरे,
माहिती व जनसम्पर्क अधिकारी,
पुणे महानगरपालिका,
१६/०३/२०२०,