दरवर्षीप्रमाणे हडपसर परीसरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा कलाकार गुढी हा उत्सव यावर्षी देशावर उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता रद्द करीत आहोत.

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


दरवर्षीप्रमाणे हडपसर परीसरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा कलाकार गुढी हा उत्सव यावर्षी देशावर उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता रद्द करीत आहोत.
येत्या 25 तारखेला होणार्‍या गुढीपाडवा निमित्ताने हडपसर कलाकार कलाकार गुढी हा उपक्रम साजरा करत असतात,परंतू सध्या देशावर कोरोना मुळे आलेले संकट निर्माण झाले आहे,,या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वजण एकत्र लढा देत आहे..कलाकारांनी याची जाणीव लक्षात घेता कलाकार गुढीची मिरवणूक यंदा रद्द करुन,मोजके कलाकार मिळून कलाकार गुढीची पुजा करुन नाट्यगृहावर गुढी लावण्यात येणार असल्याचे हडपसर कलाकार महासंघाच्या वतीने सांगण्यात आले.. कोरोना मुळे पुण्यातील नाट्यगृह-चित्रपटगृह शूटींग बंद आहेत यावर उदरनिर्वाह असलेल्या पडद्यामागील कलाकारांना महीना पुरेल एवढे अन्न वस्तु स्वरुपात व कोरोना पासुन सावधगिरी बाळगणे म्हणुन मास्क देण्यात येणार आहे..देश आणि धर्म दोन्हीचे पालन यावेळी करता येईल असे मत कलाकार प्रशांत बोगम नाटयनिर्माते दत्ता दळवी नागनाथ गवसाने विकास वाघमारे कुणाल देशमुख अण्णा लोंढे यांनी मांडले.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com


मेलवर पाठविणे बंधनकारक*