जाणिव सेवाभावी संस्था(NGO)
आज करोना मुळे सर्व जन पुरते घाबरले आहेत
आज प्रत्येकाला स्वच्छतेच महत्व पटल्याने प्रत्येकजन खडबडुन जागा झाला आहे
पण
आहे का वो लक्षात????
सन २०१२ ते २०२० म्हणजे आजतायगत
सर्वांना स्वताचा कचरा स्वता जिरवा
स्वताचे घर परीसर सोसायटी स्वच्छ ठेवा
असे गळा काढुन सांगीतल हवी असेन ती
मदत आम्ही मोफत करु असेही वेळौवेळी अव्हान केले
पण त्या वेळी साथ देन तर दुर पण मला
कचर्यावाला,कचराशेठ,भंगारवाला आला रे अस हिनवल गेल
रोज खुल्यावर पडलेले वापरलेले सॅनेटरी पॅड मानवी आरोग्यास कीती घातक आहे यावर कसे घातक विषाणु निर्माण होतात वाढतात हे जीव ओतुन सांगन्याचा प्रयत्न केला पण कधी पॅड मॅन तर कधी असल्या प्रकारची काम करतो म्हणुनही सतत अपमानीत केल गेल पण मी मात्र
आजही त्या ध्येयापासुन हटलो नव्हतो आणि नाही कारण हे पुणेने माझ्या वडिलांना जन्म दिला या पुणे शहरांने माझ्या आईला जन्म दिला व या पुणे शहराने मला जन्म दिला मग या माय भुमीचे हे उपकार कणभर का होईना फेडायचे म्हणुन केलीली स्वच्छ पुणेसाठी मोहीम यापुढे चालतच राहानार कारण हा माझा छंद आहे धंदा नाहि
यापुढे तरी जर स्वताला पुणेकर समजत असतान तर
जाणिव संस्थेच्या (NGO) प्रत्येक कार्यात सहभागी व्हा
एक जागृत पुणेकर म्हणुन
आपली
🙏जाणिव सेवाभावी संस्था(NGO)🙏
संस्थापक अध्यक्ष गणेश सोनवणे
जाणिव सेवाभावी संस्था(NGO) आज करोना मुळे सर्व जन पुरते घाबरले आहेत आज प्रत्येकाला स्वच्छतेच महत्व पटल्याने प्रत्येकजन खडबडुन जागा झाला आहे पण