*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
कृपया प्रसिद्धीसाठी दिनांक: 24/3/2020
मानवजातीला अंतर्मुख होण्याची गरज
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांची भावना
पुणे, दिनांक: 24 मार्च: कोरोनाव्हायरसच्या थैमानामुळे संपूर्ण जगाने गुडघे टेकले आहे.अशा वेळेस महान तत्त्वज्ञ संत ज्ञानेश्वर व तुकाराम यांच्या शिकवणीनुसार निसर्गाशी अथवा प्रकृतीशी एकरूप झाल्यास पुढील अनेक शतकं मानव सुखासमाधानाने नांदू शकेल. ईश्वराची कृपा, वैद्यकीय सेवा व इतर सुविधा पुरविणाऱ्यांमुळे कदाचित या संकटावर विजय मिळवू. परंतु भविष्यात असे होऊ नये यासाठी सर्वांनाच अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. अशी भावना एम.आय.टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी गुढीपाडव्या च्या पूर्व संध्येला व्यक्त केली.
ते म्हणाले, कोरोनाव्हायरस एका अतिसूक्ष्म विषाणूने आज संपूर्ण जगाला गुडघे टेकायला लावले आहे. सुपरपॉवर म्हणून ओळखले जाणारे अमेरिका, चीन, ब्रिटन, फ्रान्स, रशिया असे देश असोत किंवा इटली, जर्मनी, इराण, कॅनडा असोत, ह्या जीवघेण्या संसर्गाने जगभरात हाहा:कार माजवला आहे.
या संसर्गाची उत्पत्ती कशी, कुठे झाली, त्याची काय कारणे होती, या विषयी बरंच काही लिहिलं आणि चर्चिलं गेलं आहे. परंतु आज संपूर्ण जग याचे विध्वंसक परिणाम भोगत आहे.
मानवाच्या उत्पत्तीपासूनच मानवाने विविध गोष्टींसाठी संघर्ष केला आहे. अशांतता निर्माण केली आहे. अगदी स्वतःचे अस्तित्व टिकवण्यापासून ते स्वतःचे वर्चस्व स्थापित करण्यापर्यंत. तसेच स्वतःची हौस भागवण्यापासून ते स्वतःची प्रगती साधण्यापर्यंत. प्रत्येक गोष्टीसाठी त्याने प्रकृतीला हानि पोचवली आहे.
अमेरिका, रशिया, चीन, जर्मनी इ. देशांकडे मिळून आज पृथ्वीला दहा हजार वेळा बेचिराख करू शकतील इतकी अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉंब, न्यूट्रॉन बॉंब आदि संहारक अस्त्रे आहेत. हा सगळा शस्त्रसाठा जमवून आपण काय साधलं? आज एका सूक्ष्म जीवाच्या संसर्गामुळे आपण बाविसावे शतक बघू की नाही अशी परिस्थिती उद्भवली आहे.
जनसंपर्क विभाग
माईस एम .आय. टी, पुणे
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*