पुणे प्रवाह न्युज पोर्टल
जागतिक महिलादिना निमित्त रोटरी क्लब फिनिक्सच्या वतीने डॉ.विणा देव(लेखिका व गोनिदांच्या कन्या),आणि डॉ.शैला वाणी-गोखले(ग्रामीण भागात आरोग्यसेवा-व शिक्षण)गोरेगाव रायगड,यांची जाहीर मुलाखत रो.सौ.मधुर डोलारे यांनी घेतली.प्रिझम फाउंडेशन सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी फिनिक्सच्या अध्यक्ष रो.मानसी खुर्जेकर,सेक्रेटरी रो.हर्षदा देशपांडे आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी सदस्य व कुटुंबिय उपस्थित होते.रो.सौ.मधुर डोलारे यांनी घेतलेल्या मुलाखतीत विणा देव यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रांत आवडीने काम करणे चांगले असते.जीवनात संवेदनशिलता महत्वाची असते असे संगितले.शैला वाणी यांनी ग्रामीण भागात आजून ही अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात असून कित्येकदा लोक डॉक्टर ऐवजी पहिले मंत्रिकाकडे रूग्णाला नेतात तिथे बरा नाही झाला की मग डॉक्टरकडे नेतात.हे चूक असल्याचे सांगितले.या मुलाखतीत देव व वाणी यांनी अनेक आठवणी किस्से सांगून मुलाखत रंगतदार केली.
छायाचित्र :डावीकडून मधुर डोलारे,विणा देव,शैला वाणी,मानसी खुर्जेकर.