*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
हडपसर ,,..
रिपब्लिकन प्रेसिडियम पार्टी। आँफ इंडिया च्या पुणे शहराच्या महिला अध्यक्षपदी येथील सामाजिक कार्यकर्ते व निर्मिती मीनाताई चव्हाण यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.राष्ट्रीय अध्यक्ष भुजंगराव बडेकर यांनी त्यांची निवड केली.यावेळी पार्टीचे जिल्हाअध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सुशील वाघमारे वाजिद शेख किशोर कारंडे अर्णव कसबे प्रशांत बोगम आदि उपस्थित होते.पार्टीची ध्येय व धोरणे अंगीकृत करुन,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजातील विविध घटनांमध्ये पोहचवण्यासाठी कटिबद्ध राहील तसेच महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घेऊन त्यावरील उपाय योजना करुन सबलीकरण करण्याचा प्रयत्न करु,.समाजाच्या तळागाळातील गोरगरीब लोकांसाठी शासकीय योजना, तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देश सुजलाम सुफलाम करण्याचा अथक प्रयत्न करण्यात येईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.सद्मा त्या कोंढवा-हडपसर परीसरात कार्यरत आहेत.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*