पुणे प्रवाह न्युज पोर्टल
शिवजयंती निमित्ताने हिंदराज ग्रुप कडून क्रिडापटूंचा सन्मान व मुलांना पुस्तकांची भेट
मिरवणूक व ध्वनीक्षेपकाचा खर्च टाळून खेळाडूं प्रती कृतज्ञ्ञ्ता
गंज पेठेतील मासेआळी परिसरातील हिंदराज गु्रपने शिवजयंती उत्सव मिरवणूक तसेच मंडळाच्या देखाव्यासमोर ध्वनिक्षेपकाचा वापर न करता त्यासाठी खर्च होणा-या रकमेचा विनीयोग विविध क्रीडाप्रकारात उल्लेखनीय कामगिरी करणा-या युवा क्रीडापटूंचा सत्कार तसेच परिसरातील मुलांना दोनशे गोष्टीची पुस्तके तसेच आबासाहेब अत्रे प्रशालेतील निवडक २५ मुलांची किशोर मासिकाची वार्षिक वर्गणीची रक्कम देत आगळयावेगळया पध्दतीने साजरा केला. कार्यक्रमात शिवछत्रपती पुरस्कार तसेच राज्यस्तरीय व स्थानिक पातळीवर यावर्षी उल्लेखनिय कामगिरी करणा-या तायक्वोंदो, टेबल टेनिस, कबड्डी व कुस्ती या क्रीडाप्रकारातील महिला खेळाडूंना संदर्भतज्ज्ञ व ग्रंथप्रसारक प्रसाद भडसावळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तसेच प्रबोधनपर ग्रंथ देउन सन्मानित करण्यात आले.
सन्मानार्थींमध्ये टेबल टेनिसपटू व प्रशिक्षक उज्ज्वला गायकवाड, महाराष्टÑ कबड्डी कर्णधार मानसी रोडे, निकीता धुमाळ, खेलो इंडिया तील नागेंद्र कुरा, शालेय स्तरावर कौतुकास्पद कामगिरी करणारी साक्षी पायगुडे, सायली हनमगर, ऋतिका होनमाने, कुस्तीपटू रक्षा पवार, जागृती सुरवसे, प्रशिक्षक इमरान शेख यांना गौरविण्यात आले. तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते राष्टÑीय तायक्वोंदो खेळाडू व प्रशिक्षक नितीन खत्री यांचा ही महाराष्टÑ शासनाचा क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. ‘व्यायाम जसा शारिरीक तंदुरुस्तीसाठी असतो तसेच मानसिक स्वास्थ्यासाठी वाचन गरजेचे आहे. या दोन्हीचा विचार करत हिंदराज गु्रपच्या तरुण कार्यकर्त्यांनी मिरवणूक व ध्वनीक्षेपकाचा खर्च टाळून खेळाडूंप्रती कृतज्ञता व गं्रथप्रसाराला प्राधान्य दिले, याचे विशेष कौतुक वाटते. साहित्य व क्रीडेचा अनोखा संगम शिवजयंतीनिमित्ताने जुळून आला आहे.’ असे मत प्रसाद भडसावळे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी लखन बंडा, गणेश परदेशी, आनंद कोटला, परेश कल्याणी, अक्षय परदेशी, संदीप चिलका, प्रथमेश भोई, आनंद दासा, श्रीकांत ओझा परिसरातील जेष्ठ उपस्थित होते. भडसावळे यांनी परिसरातील मुलांना पुस्तकांचे वाटप केले. कार्यक्रमाचे निवेदन आनंद दासा यांनी केले. परिसरातील विविधरंगी फुलांच्या पाकळयाच्या सहाय्याने साकारलेल्या प्रभू श्रीराम यांच्या रांगोळीने उपस्थितांचे लक्ष वेधले होते. छत्रपतींच्या प्रतिमेसह अन्य सजावट मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वत: केली.
फोटो ओळी : शिवजयंती निमित्ताने हिंदराज ट्रस्टच्या वतीने क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या क्रीडापटूंच्या सन्मान प्रसंगी प्रसाद भडसावळे, उज्ज्वला गायकवाड व अन्य खेळाडू व कार्यकर्ते