कोरोना विषाणू संसर्गाचा प्रभावीपणे मुकाबला करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार- जिल्हाधिकारी नवल किशोर राम

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*कोरोना विषाणू संसर्गाचा प्रभावीपणे मुकाबला करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार- जिल्हाधिकारी नवल किशोर राम*


पुणे, दि. 19 : आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीयस्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण ठेवणे व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होवू न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी मार्गदर्शन सुचनेनुसार तातडीची उपाययोजना करणेकामी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने प्रत्येक विभागाने आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांनी पार पाडावयाची जबाबदारीचे वाटप केले आहे. जिल्हाधिकारी राम यांनी याबाबतचा आदेश नुकताच जारी केला आहे.
          निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे -9822107120- सहायक- विशेष कार्यकारी अधिकारी श्रीनिवास ढाणे-8888858474, नायब तहसीलदार नागेश गायकवाड-8108777507 यांच्याकडे केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने वेळोवेळी आवश्यक ते आदेश निर्गमित करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करणे, कोरोना संसर्गाच्या अनुशंगाने आवश्यकतेनुसार वाहन, इमारत  अधिग्रहण करणे, नेमणूक करण्यात आलेल्या सर्व अधिकारी तसेच इतर अन्य विभागाशी समन्वय ठेवून  आवश्यक ती कार्यवाही पार पाडणे तसेच कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुशंगाने सर्वसाधारण नियंत्रण ठेवून आवश्यक ती कार्यवाही पार पाडणे.
              उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख-9822109966 सहायक तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण 9423959494 यांच्याकडे विलगीकरण कक्ष करणे व त्याचे नियमन करणे यासंदर्भात नवीन सूचनांप्रमाणे वेगवेगळया देशातून एअरपोर्टवर आलेल्या प्रवासी यांची यादी प्राप्त करणे व सबंधित यंत्रणेला पुढील कार्यवाहीकरिता उपलब्ध करून देणे, केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे विहित नमुन्यातील अहवाल वरिष्ट कार्यालयाकडे पाठविणे याबाबत आवयक ती कार्यवाही करणे तसेच पुणे जिल्हा कार्यक्षेत्रातील नागरिकासंदर्भात सनियंत्रणासाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सनियंत्रण करणे.
                भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी सुनिल गाढे-9822535962 सहायक नायब तहसीलदार संतोष सानप-9923501285 यांच्याकडे नियंत्रण कक्ष प्रमुख म्हणून कामकाज करणे, जिल्हा नियंत्रण कक्षाकडे प्राप्त तक्रारींचे अनुशंगाने आवश्यक  ती कार्यवाही करणे, सर्व नियुक्त समन्वय अधिकारी यांच्याकडून दररोज अहवालाचे एकत्रिकरण करणे तसेच सिव्हील सर्जन व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडील आवश्यक साहित्य खरेदीबाबत निधी उपलब्ध करण्याच्या अनुशंगाने कार्यवाही करणे.
             राजशिष्टाचार विभागाचे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर-9422616033 यांच्याकडे विमानतळावरील सर्व प्रवाशांची तपासणी होते किंवा कसे याबाबत विमानतळ अधिकारी यांच्यासमवेत समन्वय ठेवणे तसेच पुणे विमानतळावर विदेशातून आलेल्या प्रवाशांच्या याद्या विमानतळ अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेणे व महानगरपालिका व सर्व नियंत्रण कक्षाकडे तात्काळ पाठविणे.
              मावळ मुळशीचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के - 9922448080 यांच्याकडे पुणे महागनरपालिका क्षेत्रातील व भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती रेश्मा माळी -9011022656 यांच्याकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या व्यक्तींशी जवळच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची यादी पुणे महानगरपालिका यांच्याकडून प्राप्त करणे महानगरपालिकेकडून रुग्णवाहिका प्राप्त करून घेण्यासाठी समन्वय करणे तसेच संबंधित नायडू तसेच वायसीएम हॉस्पीटलमधून संबंधित व्यक्तींची तपासणी करून घेण्याबाबत समन्वय साधणे.
              अन्नधान्य वितरण अधिकारी श्रीमती अस्मिता मोरे-8412077899  यांच्याकडे पुणे महानगरपालिका क्षेत्रातील व निवडणूक शाखेच्या उपजिल्हाधिकारी मृणालिनी निंबाळकर-9923207767 यांच्याकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व्हेलन्स बाबत सुरू असलेल्या कामकाजाचे अनुशंगाने माहिती घेवून नियंत्रण कक्षास कळविणे तसेच घर ते घर सर्व्हे करण्यासाठी नियुक्त केलेल्या पथकाकडून सर्व्हेबाबतची माहिती प्राप्त करून नियंत्रण कक्षास कळविणे.
               जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ अशोक नांदापूरकर-7507292181 यांच्याकडे लॅब नेटवर्कबाबतची माहिती नियंत्रण कक्षास सादर करणे तर उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार -9561213333 यांच्याकडे सर्व शासकीय, निमशासकीय आस्थापनेवरील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण संबंधित यंत्रणेकडून देण्यात आले किंवा कसे याबाबतची खात्री करून अहवाल नियंत्रण कक्षास सादर करणे तसेच कन्टेनमेंट प्लॅन काळजीपूर्वक अभ्यास करून आरोग्य विभागाच्या अधिका-यांशी समन्वयक करून याबाबत समन्वय अधिकारी यांची क्षमता बांधणी करणे.
                उपजिल्हाधिकारी सारंग कोडलकर-9405501100 यांच्याकडे पुणे जिल्हयातील सर्व तारांकित हॉटेलमध्ये भारत सरकार, आरोग्य व कुटंबकल्याण मंत्रालय, महासंचालक आरोग्य सेवा यांनी हॉटेल व लॉजींग यांच्याबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी होते किंवा कसे याबाबत खात्री करणे, सर्व पंचतारांकित हॉटेलमध्ये विदेशातून आलेले पर्यटक यांची तपासणी झाली आहे का याबाबत सर्व हॉटेल यांच्याकडून खात्री करणे व आपल्याकडील सर्व माहिती नियंत्रण कक्षास कळविणे.
              उपजिल्हाधिकारी निता सावंत- शिंदे-9421118446 यांच्याकडे भारत सरकार, आरोग्य व कुटंबकल्याण मंत्रालय, महासंचालक आरोग्य सेवा यांनी टुर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्याबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अंमलबजावणी होते किंवा कसे याबाबतचे सर्व टुर्स अँड ट्रॅव्हल्स कार्यालयाची माहिती घेणे, सर्व टुर्स अँड ट्रॅव्हल्सकडून कोरोनाग्रस्त देशात जावून आलेल्या पर्यटकांची यादी प्राप्त करून महानगरपालिका व नियंत्रण कक्षास कळविणे तसेच टुर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीकडून नजीकच्या कालावधीत कोरोनाग्रस्त देशामध्ये सहली आयोजित केलेल्या असल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ नियंत्रण कक्षास कळविणे.
                 जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड-9657701180 यांच्याकडे 24 तास अत्यावयक साहित्य पुरवठा मदत कक्षास पुरविणे, जिल्हयातील आवश्यक त्या सर्व हॉस्पीटल, विमानतळ व इतर ठिकाणी प्रतिबंधात्मक आवश्यक ती सर्व प्रकारच्या साहित्याची मागणी आरोग्य विभागाकडून प्राप्त करणे व संबंधित ठिकाणी पोहचवणे.
उपजिल्हाधिकारी श्रीमती आरती भोसले-9822332298 यांच्याकडे पुणे जिल्हयातील सर्व खाजगी रुग्णालयाच्या ठिकाणी विलगीकरण कक्ष तयार करण्यात आल्याबाबत खात्री व त्याची अद्यावत माहिती घेणे, पुरेशा प्रमाणात खाटांची व्यवस्था उपलब्ध असलेबाबत खात्री करणे, खाजगी रुग्णालयामध्ये खाटा राखीव करणे, खाजगी रुग्णालयाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात उपचार साहित्य उपलब्ध असल्याबाबत खात्री करणे तसेच सर्व माहिती नियंत्रण कक्षास कळविणे.
उपजिल्हाधिकारी अजय पवार-9403853248   यांच्याकडे पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या संदर्भात नियंत्रण आराखडा कन्टेनमेंट प्लॅनची अंमलबजावणी होते की नाही याबाबत खात्री करणे, सर्व माहिती नियंत्रण कक्षाला कळविण्यात यावी, सूक्ष्म आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत कार्यवाही करणे.
    उपजिल्हाधिकारी प्रविण साळुंखे -9975532173 यांच्याकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या संदर्भात नियंत्रण आराखड्याची अंमलबजावणी होते की नाही याबाबत खात्री करणे. सर्व माहिती नियंत्रण कक्षाला कळविण्यात यावी.
    उपजिल्हाधिकारी श्रीमंत पाटोळे-9075748361  डेयांच्याकबाहेर देशातून आलेल्या लोकांसाठी इन्स्टीटयूशनल कोरोनटाईन करण्यासाठी पुरेशी व्यवस्था असल्याबाबतची पाहणी करणे.  त्याबाबतची माहिती संबंधितांना कळविणे.
    उपजिल्हाधिकारी श्रीमती वैशाली इंदाणी 9422607907  यांच्याकडेपुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत जैविक कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रीय पध्दतीने लावणेबाबत कार्यवाही करणे.    
जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे-9850791111 व उपजिल्हाधिकारी श्रीमती सुरेखा माने 7775905315 यांच्याकडे आयसोलेशन वॉर्डमध्ये चहापाणी, जेवण, पोलीस बंदोबस्त, रग्णवाहिका इत्यादी सुविधा आहेत का याची खात्री करण्याच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारीबाबत वेळोवेळी आवश्यक ती कार्यवाही करणे. 
  पुणे पिंपरी चिंचवडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर 9422221114 सर्व प्रकारची वाहतूक व्यवस्था करणे. सर्व माहिती नियंत्रण कक्षाला कळविणेत यावी. कन्टेनमेंट प्लॅन मधील वाहनांसंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करणे.
   उपजिल्हाधिकारी रामदास जगताप 9423009777 कंटेनमेंट प्लॅनमधील मार्गदर्शक सूचना क्रमांक 6.3 रॅपीड रिस्पॉन्स टीम आरआरटी बाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे कार्यवाही करणे. तसेच इंटर   सेक्टरल कोऑर्डीनेशन करणे. 
     उपजिल्हाधिकारी सचिन इथापे-9881002321 यांच्याकडे पुणे महानगरपालिका हद्दीत महानगरपालिकेकडून कन्टेनमेंट प्लॅनमधील  होम कॉरनटाईनबाबत दिलेल्या मार्गदर्शक सुचनाचे अंमलबजावणी होते किंवा कसे याची खात्री करणे. या अनुषंगाने आवश्यक ती सर्व कार्यवाही करणे. 
  उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे 9422072512 यांच्याकडे पिंपरी चिंचवड  महानगरपालिकाकडून कन्टेनमेंट प्लॅनमधील होम कॉरनटाईन बाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी होते किंवा कसे याची खात्री करणे या अनुषंगाने आवश्यक ती सर्व कार्यवाही करणे. 
   उपजिल्हाधिकारी सुधीर जोशी 9970819597 यांच्याकडे  विभागीय आयुक्त कार्यालयाशी समन्वय ठेवण्यात यावा. भारत सरकार,महाराष्ट्र शासन व विभागीय आयुक्त यांच्याकडील आदेश सूचना  जिल्हाधिकारी यांना अवगत करणे. विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी समन्वय ठेवणे आवश्यक ती माहिती आयुक्त कार्यालयात पुरवणे.
 उपजिल्हाधिकारी अविनाश हदगल 7028425256, उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख 9594612444 यांच्याकडे आपल्या कार्यक्षेत्रातील कंपन्या व उद्योग घटकातील अधिकारी व कर्मचारी यांच्या परेदश दौरे बाबतचा अहवाल दररोज नियंत्रण कक्षास  सादर करणे, विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या विविध प्रतिबंधात्मक आदेशाची अंमलबजावणी करणे बाबत आवश्यक ती कार्यवाही करणे तसेच कन्टेनमेंट प्लॅनप्रमाणे गरजेप्रमाणे कार्यवाही करणे.
 जिल्हा सैनिक अधिकारी मिलिंद तुंगार यांच्याकडे पुणे जिल्ह्यातील छावणी व कटक मंडळाच्या कार्यक्षेत्रात होम कॉरनटाईनबाबत सव्हेलन्स हॉस्पटल् केअरबाबत सर्व कार्यवाही करणे तसेच जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात राहून जिल्हाधिकारी यांच्या निर्देश त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही करणे 
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे यांच्याकडे कम्युनिकेशन मटेरियल,कम्युनिकेशन चॅनल,मास,कम्युनिकेशन डेडिकेटेड हेल्पलाइन इत्यादीबाबत आवश्यक ती कार्यवाही करणे 
झोपडपट्टी पुनर्वसनचे उपजिल्हाधिकारी संजय पवार यांच्याकडे जिल्हा जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक आरोग्य विभाग व शिक्षण विभाग यांच्याशी समन्वय साधत कोरोना संसर्गाचा पुणे जिल्ह्यामध्ये जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे बाबत आवश्यक ती कार्यवाही करणे 
कमाल जमीन धारणा कायदा उपजिल्हाधिकारी श्रीमती गीतांजली शिर्के यांच्याकडे जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर ट्विटर,फेसबुक पेज इत्यादीवर कोरोना संसर्गाच्या अनुशंगाने माहिती अद्ययावत करणे तसेच 
जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांच्याकडे मीडिया मॉनीटरींग व मॅनेजमेंटबाबत आवश्यक ती कार्यवाही करणे अशा जबाबदा-या सोपविण्यात आल्या आहेत. कोरोना संसर्गाच्य अनुशंगाने देण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी राम यांनी नुकतेच निर्गमित केले आहेत.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*