खाकी वर्दीतील अशीही सामाजिक बांधिलकी..*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*खाकी वर्दीतील अशीही सामाजिक बांधिलकी..*


आज दुपारी पुणे कँम्प भागातील सेंट व्हीन्सेंट शाळेजवळ एक रिक्षाचालक रिक्षातच बेशुध्द पडून मरण पावल्याचे  आढळले.लष्कर पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला असता त्यांची पत्नी व लहान मुले वगळता इतर कोणीही नव्हते. सदर रिक्षाचालकास पुढील वैद्यकीय कार्यवाहीसाठी ससून रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी *पोलिसांनी एका सामाजिक संस्थेची अँम्ब्यूलन्स मिळवली परंतु त्यावर चालक नसल्याने चारबावडी पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक गणेश कुलाळ यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वतः अँम्ब्यूलन्स चालवून सदर रिक्षाचालकास ससून रुग्णालयात दाखल केले.* त्यावेळी त्यांच्या सोबत पोलीस हवालदार एकनाथ एक्के, पोलीस शिपाई जगदाळे कर्तव्यावर होते.
     *यापूर्वीही पोलीस उपनिरीक्षक कुलाळ यांनी अनेकदा आपल्यातील सामाजिक बांधिलकी जपली होती. आज स्वतः अँम्ब्यूलन्सचे चालक होऊन त्यांनी खाकी वर्दीतील माणूसपणाचे दर्शन घडविल्याबद्दल कँम्प भागातील सामाजिक संघटना व नागरिकांनी त्यांचे कौतुक केले असून कर्तव्य फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे यांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत*