*मजूर, कामगारांनी  स्थलांतर करू नये* *आरोग्य, जेवण व निवास व्यवस्था शासन करणार* - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

*मजूर, कामगारांनी  स्थलांतर करू नये*
*आरोग्य, जेवण व निवास व्यवस्था शासन करणार*
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे



मुंबई, दि. 28: 'करोना' प्रसाराच्या पार्श्वभूमीवर मजूर, कामगार यांनी कामाचे ठिकाण सोडून जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. 
या मजुरांच्या आरोग्याची काळजी, जेवणाची व राहण्याची व्यवस्था करण्यासाठी शासन सक्षम आहे, असे त्यांनी सांगितले.


श्री. ठाकरे पुढे म्हणाले, मजूर, कामगारांचे आरोग्य, जेवण तसेच आहे त्याच ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश महसूल यंत्रणेला आणि स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे कोणीही कामाचे ठिकाण सोडून जाऊ नये. मदतीची आवश्यकता असल्यास तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा महानगरांच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग  कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.


000