कोल्हार घोटी राज्यमार्ग क्रमांक ५० संदर्भात बांदकाम मंत्री मा अशोकजी चव्हाण साहेब यांची भेट

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


आज  दिनांक 2-3-2020 रोजी  *जय भाऊ देशमुख* यांनी कोल्हार घोटी राज्यमार्ग क्रमांक ५० संदर्भात बांदकाम मंत्री मा अशोकजी चव्हाण साहेब यांची भेट घेऊन कोल्हार घोटी राज्यमार्ग सिमेंट कॉक्रीट चा व्हावा म्हणून निवेदन दिले.
कोल्हार घोटी राज्यमार्गावर वर दैनंदिन ३५ हजार मेट्रिक टनापेक्षा जास्त वाहतूक होते.सद्यस्थितीत संगमनेर ते बारी या दिडपदरी असणार्या स्त्याच्ये शासनाच्या हायब्रीड अन्युटी या राज्यसरकारच्या नवीन  धोरणानुसार २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करुन दुपपदरी रस्त्याचे काम सुरु आहे.सध्या रस्त्याचे 5.50 मी लांबीचा रस्ता असून तो सध्या 7 मी लांबीचा होत आहे दोन्ही बाजूने पेवर सोलर ( साईड पट्ट्या)  असतील या रस्त्याच्या दरम्यान येणाऱ्या मोठ्या गावालगतचे रस्ते सिमेंट कॅाक्रिंटीग चे होणार आहेत आणि उर्वरित रस्ता डांबरी असणार आहे.


                 संगमनेर ते बारी या रस्त्याचे अतंर ६७ किमी आहे.दरम्यान अकोले ते संगमनेर २२ किमी आहे.या रस्त्यावर सर्वाधिक वाहतूक असते आणि रस्ता दुपपदरी झाल्यावर वाहतूकीचे प्रमाण वाढणार आहे. यामुळे भविष्यातील वाहतुकीचे प्रमाण बघता संपूर्ण रस्ता हा सिमेंट कॅाक्रिंटिग मध्ये करण्यात यावा.त्यासाठी आपण सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता व कार्यकारी अभियंता तसेच उप अभियंता यांना आदेशित करुण संपूर्ण रस्ता  हा सिमेंट कॅाक्रिंटीगमध्ये करण्यात यावा अश्याप्रकारची मागणी आज  *जय भाऊ देशमुख* यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना *अशोकजी* *चव्हाण साहेब* यांना भेटून केली.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*