पुणे प्रवाह न्युज पोर्टल
press release *धनकवडी ,बालाजी नगर भागात डब्यांची सुविधा :संदीप सोनावणे मित्र परिवाराचा पुढाकार*
पुणे :
कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर घरच्या जेवणाची सोय नसलेल्या नोकरदार ,मजूर,ज्येष्ठ नागरिक ,विद्यार्थी वर्गाला जेवणाचे डबे उपलब्ध करून देण्याची सुविधा सामाजिक कार्यकर्ते संदीप सोनवणे यांनी उपलब्ध करून दिली आहे .
'ना नफा ना तोटा ' तत्वावर ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे . ४ पोळ्या ,१ भाजी ,वरण भात डबा ४० रुपयात देण्यात येत आहे . पोलीस आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांना मोफत डबे दिले जाणार आहेत. धनकवडी ,बालाजी नगर,भारती विद्यापीठ ,आंबेगाव पठार ,के के मार्केट परिसरात ही सुविधा उपलब्ध झाली आहे . संदीप सोनावणे,सागर फाटक ,राहुल सोनावणे ,अजिंक्य गजरे या कार्यकर्त्यांनी त्यात पुढाकार घेतला असून सोशल मीडिया द्वारे सुविधेची माहिती दिली जात आहे . 200 जणांना ही सेवा कालपासून दिली जात आहेत.500 व्यक्तींनी नोंदणी केली आहे. ------------------------------------