ऑल इंडिया जर्नलिस्ट असोशियन महाराष्ट्र प्रदेश सहसंघटक पदी अनिल मोरे यांची तर पुणे महानगर अध्यक्षपदी समीर देसाई यांची निवड करण्यात आली

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पुणे:- 
ऑल इंडिया जर्नलिस्ट असोशियन महाराष्ट्र प्रदेश सहसंघटक पदी अनिल मोरे यांची तर पुणे महानगर अध्यक्षपदी समीर देसाई यांची निवड करण्यात आली.
असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष संजय भोकरे यांनी ही निवड जाहीर केली. 
  यावेळी पुणे महानगर कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली.
नूतन कार्यकारणी मध्ये कार्याध्यक्षपदी दत्तात्रय पोपळघट, महेश टेळे पाटील, अमित कुचेकर, उपाध्यक्षपदी जगदीश कुंभार, विकास भागीवंत, मनोज गायकवाड, विशाल भालेराव, सरचिटणीस पदी संदीप भटेवरा, खजिनदारपदी धनराज गरड, सचिवपदी सुनील मोरे, संपर्कप्रमुख पदी सागर बोदगिरे, सहसचिव मोहित शिंदे, अनिल दहोत्रे, संघटक पदी जितेंद्र मैड, महिला विभाग प्रमुख पदी रागिनी सोनवणे, वृत्तवाहिनीवर प्रमुख तुकाराम गोडसे, तुषार पायगुडे, सोशल मीडिया विभाग - अजित पाटील, मनोज जाधव, कार्यकारिणी सदस्यपदी गोरख गायकवाड, दिपक पाटील, नागनाथ होनमाने, संदीप घुले, अमित मेहेंदळे, छायाचित्रकार शिवाजी हुलावळे,  यांची निवड अध्यक्ष समीर देसाई यांनी जाहीर केली.


ऑल इंडिया जर्नालिस्ट स्टेशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय भोकरे यांच्या हस्ते नूतन कार्यकारिणीला नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले.
यावेळी असोसिएशनचे कायदेशीर सल्लागार मंदार-जोशी, आरपीआयचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पुणे शहर आणि परिसरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पत्रकारिता हा व्यवसाय नसून छंद म्हणून या कलेकडे पाहावे पत्रकारिता करत असताना प्रत्येक पत्रकाराने आपले व्यवसाय सक्षम करावे तसेच आपल्या समाजाचे आपण देणे लागतो हे डोळ्यासमोर ठेवून निस्वार्थ भावनेने समाजासाठी कार्यरत रहावे, पत्रकार म्हणून एक अढळ स्थान निर्माण करावे.
असे आवाहन ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय भोकरे यांनी केले


पुणे शहर, उपनगर व महानगर परिसरातील पत्रकारांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून पत्रकारांना सदनिका तसेच पत्रकार संरक्षण कायदा व विमा उतरविण्याच्या दृष्टीने आगामी काळामध्ये नियोजन केले जाईल. पत्रकारांच्या कल्याणासाठी विविध उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश सहसंघटक
अनिल मोरे यांनी दिली.


आगामी काळात असोसिएशनच्या माध्यमातून सभासद नोंदणी करणार तसेच पत्रकारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी व्यापक  मोहीम हाती घेणार आहे अध्यक्षपदाची संधी मिळाल्याने जबाबदारी मोठी वाढली असून त्या जबाबदारीची जाणीव ठेवून विविध उपक्रम राबविणार आहे. अशी ग्वाही नवनिर्वाचित असोसिएशनचे पुणे महानगर अध्यक्ष
समीर देसाई यांनी दिली.