परतीचे दोर कापलेल्या सोमनाथ लोहारला राष्ट्रवादी विधार्थी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष?*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*परतीचे दोर कापलेल्या सोमनाथ लोहारला राष्ट्रवादी विधार्थी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष?*
वडील शेतमजूर असलेल्या घरात जन्मलेल्या सोमनाथच्या घरची परिस्थिती अतिशय प्रतिकुल परंतु त्याचे आजोबा कमालीचे जिद्दी आणि महत्वकांक्षी कारण त्यांनी सोमनाथ च्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी त्याच्या चुलत्यांना नोकरीच्या शोधात पुण्याकडे पाठविले, नोकरी मिळताच सोमनाथ ला ईयत्ता ४थी पासूनच शिक्षणासाठी पुण्याला पाठवले, ४थी ते बी. बी. ए (फायनान्स) पर्यंत शिक्षण झाल्या नंतर त्याने यु. पी. एस. सी परिक्षेसाठी तयारी सुरु केली, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात यु. पी. एस. सी परिक्षेची तयारी करत असताना त्याचे लहानपणी पासून आदर्श असलेले आदरणीय पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष काम करण्यात जास्त रस असणारा सोमनाथ त्याच्या सोबतच्या विधार्थी मित्रांना येत असलेल्या लहान सहान अडचणी वेळोवेळी सोडविण्याचा प्रयत्न करत होता आणि कालांतराने त्याचे काम बघून पक्ष श्रेष्ठींनी त्याला राष्ट्रवादी विधार्थी काँग्रेस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अध्यक्ष म्हणून काम करण्याची जबाबदारी दिली. आन् प्रत्यक्ष सक्रिय होऊन जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत असताना *सोमनाथला इंजिनिअरिंगच्या विधार्थी मित्रांना न्याय मिळवून देत असताना अटक झाली*, गरिब होतकरू  विधार्थी मित्रांना कमवा शिकवा योजनेत न्याय मिळवून देत असताना *पुन्हा अटक*, विधार्थ्यांच्या  सुविधेसाठी उपलब्ध खानावळीत ठेकेदाराच्या सोईचे परिपत्रक काढले आसता त्या विरोधात आंदोलन करत असताना त्याच्यसह त्याच्यावर *कलम ३५३,३५४ सारखे गंभीर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले* तरी त्याचा विधार्थी हिताचा लढा कधी थांबला नाही, त्याच दरम्यान त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता भर कार्यक्रमात जवळ जवळ १८,०००-१९,००० लोकांमध्ये मुख्यमंत्री महोदयांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा फडणवीस यांनी २-३ मिनिटांत कार्यक्रम स्थळ सोडून देने पसंत केले आणि त्याला *तिसऱ्यांदा अटक* करण्यात आली. विधापीठाला जाणीव झाली की हा लढा थांबण अशक्य आहे तेव्हा त्यांनी परिपत्रक रद्द केले परंतु केस(कलमे) मात्र सुरू ठेवली. त्या नंतर CAA/NRC/CAB सारखी १६००-२,००० विधार्थी सह संसद रत्न खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या उपस्थितीत निषेध मोर्चा घेतला. त्यामुळे सोमनाथ अजून सक्षम यात शंकाच नाही परंतु या सगळ्यात *बर्याचदा अटक, विविध केसेस यामुळे तो परिक्षेपासून कायमचा दुरावला आता आपण असेही म्हणु शकता त्याने विधार्थी संघटनेत काम करत असताना परतीचे दोर कापले आहेत.* तर सध्या त्याला राष्ट्रवादी विधार्थी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विविध भागातील विद्यार्थ्यां कडून सोमनाथ लोहार या नावाची मागणी होत असल्याचे विधार्थ्यांमधुन समजते. परंतु आता पक्षातील वरिष्ठांच्या निर्णयाची उत्सुकता सर्वाना लागली आहे.