*कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर दानशूर व्यक्तीमत्व म्हणून प्रसिद्ध असलेले टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांनी टाटा ट्रस्टतर्फे दीड हजार कोटीची मदत ...... *मा. रतन टाटा*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


मुंबई : कोरोना व्हायरसचं संकट दिवसेंदिवस गडद होताना दिसत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकार आणि प्रशासन रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. आता सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींही याला हातभार लावत आहेत. याच पार्श्वभूमीवर दानशूर व्यक्तीमत्व म्हणून प्रसिद्ध असलेले टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांनी टाटा ट्रस्टतर्फे 500 कोटींची मदत जाहीर केली होती. यानंतर काही वेळातचं टाटा सन्सने आणखी एक हजार कोटी रूपयांचा निधी देण्याची घोषणा केली. म्हणजे एकूण दीड हजार कोटी. टाटा समूहाबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात अपार आपुलकी आहे, ती त्यांच्या या देशप्रेम आणि दानशूरपणामुळेच. ही मदत कोरोनाबाधितांसाठी असणार आहे. टाटा ट्रस्टने एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे याची माहिती दिली आहे. यापूर्वी आनंद महिंद्रा, अनिल अगरवाल यांनीही पुढाकार घेत मदत केली आहे.
कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या संकटाशी लढण्यासाठी केंद्र सरकारने 15 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलं आहे. तर, या काळात कोणी उपाशी राहु नये म्हणून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत 1 लाख 70 हजार कोटीच्या पॅकेजची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केली. अन्नसुरक्षा आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गाला थेट पैसे देण्याची योजना केंद्र सरकारने घोषित केली. देशात कुणालाही उपाशीपोटी झोपण्याची वेळ येऊ देणार नाही, तसेच खिशात पैसे नाहीत अशी अवस्था असणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
कोरोनाविरूद्धच्या लढ्यात उद्योजकांचा मदतीचा हात
देशात कोरोना व्हायरस फोफावत असल्याचं चित्र दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 400 पार पोहोचली आहे. अशा जीवघेण्या आजाराशी लढण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार अनेक प्रयत्न करत असून यंत्रणाही सज्ज झाल्या आहेत. अशातच आता कोरोनाशी दोन हात करण्यासाठी उद्योजकांनी पुढाकार घेतला आहे. टाटा समुहाचे प्रमुख रतन टाटा यांनी 500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. कोरोना लढ्यात लागणारे वैद्यकीय साहित्य, टेस्टींग किट्स, व्हेंटिलेटर्स, रुग्णालयातील सोयी-सुविधा आदी वस्तू घेण्यासाठी ही मदत देण्यात आल्याचं प्रसिद्ध पत्रकात लिहले आहे.
उद्योग क्षेत्रातून मदतीचा हात
यापूर्वी भारतात अग्रगण्य असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरपर्सन आनंद महिंद्रा यांनी कोरना विरूद्धच्या लढ्याला मदत केली आहे. त्यांनी आपला संपूर्ण पगार कोरोनासाठीच्या उपाययोजनांसाठी लागणाऱ्या निधीला देण्याचं जाहीर केलं आहे. त्यांनी आपल्या ऑफिशिअल ट्विटर हॅन्डलवरून ट्वीट करत ही माहिती दिली आहे. एवढचं नाहीतर आपल्या सहकाऱ्यांनाही आपला पगार निधी म्हणून देण्याचं आवाहन केलं आहे. तसेच पुढील महिन्यामध्ये आणखीन काही घोषणा करणार असल्याचेही महिंद्रा यांनी स्पष्ट केलं आहे.


आनंद महिंद्रा यांनी कोरोनासाठीच्या लढ्याला निधी दिल्यानंतर आता वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी करोनापासून बचाव करण्यासाठी 100 कोटींचा मदतनिधी देत असल्याची घोषणा केली आहे. तर पेटीएमचे संस्थापक विजय शर्मा यांनी करोनाच्या लसीवरील संशोधकानासाठी 5 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी ट्विटवरुन कोरोनासाठी मदत करणार असल्याची घोषणा केली. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, ‘मी या महामारीविरोधात लढण्यासाठी 100 कोटी रुपये देण्याचे वचन देतो. आम्ही देशाला दिलेल्या वचनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेत आहोत. यावेळी देशाला आमची सर्वात जास्त गरज आहे. अनेक लोक भविष्याबद्दल संभ्रमात आहेत. ज्यांचे हातावर पोट आहे त्यांच्यासाठी मी खास चिंतेत आहे. आम्ही आमच्यामार्फत मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत