पुणे प्रवाह न्युज पोर्टल
⭕सुमारे २५० कि.मी.आंतर पायी चालत आलेल्या २५ कुंटूबिंयाना वरीष्ठ पाेलीस निरीक्षकांने नाष्टा,चहा पाण्याची व्यवस्था करून कर्नाटकात केले घरपाेहच.....
⭕आणी बाणीच्या काळात खाकीवर्दीतील माणूसकी चे दर्शन...!
पुणे हडपसर येथून संचारबंदीच्या कालावधीत वाहानांचा आभाव आसल्याने सुमारे २५० कि.मी.पायी चालत आलेल्या कर्नाटकातील कष्टकरी गरीब लाेकांना विजापुर नाका पाेलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.हेमंत शेंडगे व मा.आ.रविकांतजी पाटील युवा मंच ,शिवसेना मध्यवर्ती गणेशोस्तव महामंडळाचे संस्थापक सदस्य सकलेश बाबुळगावकर,शिवपुत्र वाघमारे यांनी नाष्टा,चहा,पाणीची व्यवस्था करून त्यांना घरपाेच करण्यासाठी वाहान व्यवस्था केल्याने खाकीवर्दितील माणूस की चे दर्शन स्पष्ठ झाले आहे.
पुणे हडपसर येथे आपले पोट भरण्यासाठी गरीब कष्टकरी सुमारे २५ कुटुंबीय रायचुर जिल्हातील लिंगसुर तालुका गोनवाटला तांडा येथील कुटुंबिय कामानिमित्त मुलाबाळा सहगेले हाेते.
सद्याच्या काेराेना साथीमुऴे पुण्यातुन आपल्यामुऴ गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. संचारबंदीमुळे वाहान् बंद आसल्याने त्यांनी आपल्या मुळ गावी मुलाबाळासह चालत जाण्याचा निर्णय घेतली.250 कि. मी. आंतर पायी कापत साेलापुर गाठल्. त्यांना येताना रस्त्यात आन्न पाण्याविनी फारच हाल झाले.साेलापुरात पाेहचल्यावर ही घटना विजापुर नाका पाे.स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.. हेमंत शेंडगे समजताच त्या कुटूंबियांची माहीती घेऊन त्यांनी मा.आ.रविकांतजी पाटील युवा मंच व शिवसेना मध्यवर्ती गणेशोस्तव महामंडळाचे संस्थापक सदस्य सकलेश बाबुळगावकर व शिवपुत्र वाघमारे यांना माहीती देऊन भूकेल्या लहान लेकरा बाळासह कूटूंबीयांना पाेटभरून नाष्टा,चहा पाणी करून देण्याचे आदेश दिले.व त्याना गावी कर्नाटकात जाण्यासाठी दोन वाहानाची व्यवस्थाकरून देण्याचे सांगितले यावेळी विकास मरगुर,पंचनाथ वाघमारे,प्रवाण वाघमारे,प्रशांत वाघमारे,राजकुमार व्हनकोरे,विजापुर नाका पोलीस स्टेशनचे विषेश शाखेचे पोलीस हेड.काॅ.बक्कल नं.१०९९ देवीदास वाल्मिकी,पोलीस काॅ.१५०५ प्रफुल्ल वजमाने,सैफुल बिट मार्शलचे पोलीस काॅ.१२६४ नितीन गायकवाड,पोलीस काॅ.१८३९ बालाजी जाधव आदी उपस्थित होते.