हातावर पोट असलेल्यांना नगरसेवक सचिन गिलबिले यांचा मदतीचा हात 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


हातावर पोट असलेल्यांना नगरसेवक सचिन गिलबिले यांचा मदतीचा हात
आळंदी देवाची : दिनेश कुऱ्हाडे 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सुरू असलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या असंघटित कामगार, मजूर, रोजंदारी मजूर, हातरिक्षा चालक, घरकाम करणाऱ्या महिला, बांधकाम – हॉटेलात काम करणारे कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी आळंदी नगरपरिषदेचे नगरसेवक सचिन गिलबिले आणि मित्र परिवाराच्या वतीने गरजूंना २१ दिवस पुरेल एवढे किराणा सामान मोफत वाटप करण्यात येत आहे.अशा गरजू लोकांची आळंदी शहरातील इंद्रायणी नगर, तापकीर नगर, देहू फाटा भागातून एक यादी बनवण्यात आली असून, कोणालाही यासाठी घराबाहेर जावे लागणार नसून, त्यांना घरपोच हे शिधा सामान दिले जात आहे. आज व उद्या हे वाटप केले जाणार असून आणखी कोणी गरजू असल्यास त्यांनी नगरसेवक सचिन गिलबिले आणि नगरसेवक दिनेश घुले यांना संपर्क करावा, कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे.कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून देशभरात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. परंतु ज्या गरीबांचे निव्वळ हातावर पोट आहे, अशा लोकांवर या काळात उपासमारीची वेळ येऊ शकते, यामुळे आळंदी नगरपरिषदेचे नगरसेवक सचिन गिलबिले व नगरसेवक दिनेश घुले यांच्या संकल्पनेतून आळंदी तील अशा गरजू लोकांची यादी करून त्यांना  मदतीचा हात देण्यात आला आहे. नगरसेवक सचिन गिलबिले यांनी आळंदी शहरातील नागरिकांना आवाहन केले असून प्रामुख्याने तांदूळ, तेल, मीठ, साखर, चहा पावडर, तूरडाळ, चटणी, हळद आणि भाजीपाला हे साहित्य गोळा करून ते गरजूंना वाटप करण्यात यावे. 
यावेळी नगरसेवक सचिन गिलबिले म्हणाले या काळात आपल्या गावातील कष्टकरी गरीब वर्ग आहे ज्यांचे हातावर पोट भरले जाते अशा आपल्या बांधवांसाठी आपण *'एक हात मदतीचा'* ही मोहीम सुरू केलेली आहे. या काळात त्यांचे काम बंद असल्यामुळे त्यांची गरज ओळखून घेता आपण यथा शक्ती मदत करणार आहोत. मग ती मदत किराणा माल व भाजीपाला च्या स्वरूपात असणार आहे. नगरसेवक सचिन गिलबिले यांच्या या कार्याचे आळंदी शहरातून कौतुकाचा वर्षाव होत असून आळंदी शहरातील आजी माजी नगरसेवकांनी आणि नगरसेविकांनी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत या गरजूंना मदतीचा हात दिला पाहिजे.