पुणे प्रवाह न्युज पोर्टल
आज अर्थसंकल्पीय अधिवेशन दरम्यान विधानसभा मध्ये नगररोडच्या लक्षवेधी वर चर्चा करत असताना वडगावशेरी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुनिलआण्णा टिंगरे यांनी पुणे शहरातील नगररोड वरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी अनेक पर्यायी रस्ते (नदीकाठचा खराडी- शिवने) व उड्डाणपूल लवकरात लवकर पूर्ण करावे अश्या शासनाला सूचना केल्या. तसेच केंद्र सरकारच्या (संरक्षण खाते,एयर फोर्स, सैन्यदल, वन विभाग) हद्दीत असलेले जमिनी त्वरीत हस्तांतरीत करुन पर्यायी रस्ते तयार करावे ज्याने करुन नगररोडची वाहतूक कोंडी समस्या संपुष्टात येतील या वर शासनाचे लक्ष सुनिलआण्णानी वेधले. शासन तातडीने लक्ष घालून ह्या समस्याला प्राधान्य देऊन मार्गी लावाव्यात अशी मागणी या ठिकाणी आमदार सुनिलआण्णा टिंगरे यांनी केली.