डॉ. निलेश साबळे कडून जाहीर माफी...*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


 


*डॉ. निलेश साबळे कडून जाहीर माफी...*
महाराजा सयाजीराव गायकवाड आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यापेक्षा कुणीही मोठा नाही...! महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज व फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा आहे, व राहील.


*संभाजी ब्रिगेड'च्या पाठपुराव्याला यश... डॉ. निलेश साबळे व 'चला हवा येऊ द्या...' टिम आणि Zee मराठी यांच्याकडून अधिकृत माफीनामा प्रसिध्द.* मात्र महापुरुषांची बदनामी करणाऱ्या मागचा मेंदू शोधल्याशिवाय संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही. कलाकारांनाही ही विनंती वजा सूचना की, आपण जी कला प्रदर्शित करतो त्यामुळे जर कुणाच्या भावना दुखावणार असतील तर त्या आपण वेळीच थांबवाव्यात अन्यथा तुम्हाला उद्या महाराष्ट्रभर फिरायचं आहे. सुपाऱ्या घेऊन बोंबलत फिरताना संभाजी ब्रिगेडच्या धक्क्याला तुम्हाला सामोरं जावं लागेल... 
*मा. पुरूषोत्तम खेडेकर साहेब तुम्ही जर आम्हाला चळवळीत आणून विचारांचं 'बाळकडू' पाजलं नसतं... तर ह्या सडक्या विकृत मनुवादी विचारांच्या लोकांनी महाराष्ट्रात विकृतीचं थैमान घातलं असतं. साहेब धन्यवाद.*


महाराष्ट्रातील तमाम संभाजी ब्रिगेडच्या मावळ्यांचे व चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन... खा. डॉ. अमोल कोल्हे सरांचे मनःपूर्वक आभार


*#जय_जिजाऊ... #जय_शिवराय...!!*


*Live... 'चला हवा येऊ द्या' शो मधून पण जाहीर माफी मागितली पाहिजे.*


- संतोष शिंदे, 
जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, पुणे.