“मुख्यमंत्री ठाकरे करंडक” क्रिकेट स्पर्धा तळजाई इलेव्हनने जिंकली.

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


शिवसेना पर्वती मतदार संघाच्या वतीने “मुख्यमंत्री ठाकरे करंडक”भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.सदर स्पर्धा एक आठवडा सदू शिंदे क्रिकेट मैदान तळजाई येथे सुरु होती.याचे संयोजन विभाग प्रमुख सूरज लोखंडे,मनिष जगदाळे,किशोर रजपूत यांनी केले.या स्पर्धेत एकूण ५० संघांनी भाग घेतला.प्रथम क्रमांकाचे विजेतेपद तळजाई इलेव्हन संघाने तर उप विजेतेपद परी इलेव्हन क्रिकेट संघाने मिळविले.त्यांना मा.मोहनराव दुधाने(चीफ एक्झिक्यूटीव्ह ऑफिसर,सेंट्रल रेल्वे पुणे डिव्हिजन) यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व रोख ४४,०००/-चव्वेचाळीस हजार,व उपविजेत्या संघास ३३,०००/-तेहतीस हजार रोख व सन्मानचिन्ह,तृतीय क्रमांकाच्या संघास रोख २२,०००/-व सन्मानचिन्ह देण्यात आले.या स्पर्धेच्या अंतिम सामन्याची सुरुवात शिवसेना पुणेजिल्हा प्रमुख मा.रमेश बाप्पू कोंडे यांनी नाणेफेक करून केली.या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडूस हीरोहोंडा कंपनीची मोटार सायकल,तर विशेष नैपुण्य दाखविणारे खेळाडूंना एलसीडी दूरचित्रवाणी संच तर इतर खेळाडूंना सन्मानचिन्ह देण्यात आले.यावेळी आपल्या भाषणात अशा मैदानी क्रिडास्पर्धा होणे ही काळाची गरज आहे,सध्याचा तरुण अधिकाधिक व्यसनाकडे वळत आहे.खेळ स्पर्धा याकडे युवकांचा कल वाढला पाहिजे यामुळे तरुणांमध्ये सांघिक एक्यभावना वाढीस लागते.ही बाब आजच्या युवकांसाठी अतिचय आवश्यक आहे असे दुधाने यांनी प्रतिपादन केले.


       या प्रसंगी आयोजक सूरज लोखंडे,मानिष जगदाळे,किशोर रजपूत,मोहनराव दुधाने,हरिओम उणेचा(उद्योजक),श्रुती नाझिरकर(महिला आघाडी उपशहर प्रमुख),निलेशदादा गिरमे(विभागप्रमुख),शशिभाऊ पापळ समन्वयक पर्वती विभाग),निलेश पवार(सामाजिक कार्यकर्ते),प्रशांतभाऊ काळे(सामाजिक कार्यकर्ते),गणपतभाऊ कडू(उपविभाग प्रमुख),कृष्णाभाऊ नवले(शिवभक्त),तानाजी लोहकरे(उपविभाग प्रमुख),पंच अजयभाऊ आवळे,हांबर,प्रदीप शिवशरण(सामाजिक कार्यकर्त),बाप्पू निंबाळकर,आदि मान्यवरांच्या बरोबरच क्रिकेट प्रेमी नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.      


छायाचित्र :विजेत्या संघास बक्षीस देताना सूरज लोखंडे,मानिष जगदाळे,मोहन दुधाने,किशोर रजपूत


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*