भाषा हि संस्कृतीची वाहक आहे" प्रा. वानखेडे*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*"भाषा हि संस्कृतीची वाहक आहे" प्रा. वानखेडे*
मराठी भाषा दिनानिमित्त शिवसेना खडकवासला व राजमाता जिजाऊ नवरात्र उत्सव मंडळाचे वतीने महालक्ष्मी मंदिर येथे मराठी साहित्यिक, कवी, कलाकार, डॉक्टर्स व वकिल यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी बोलताना कवी प्रा. चंद्रकांत वानखेडे यांनी मराठी हि फक्त संवादाचे माध्यम नसून ती संस्कृतीची वाहक आहे. भाषेमुळेच आपल्या संस्कृतीची ओळख समाजाला होते. मराठी मध्ये शिवाजी महाराज म्हटले कि आपल्याला होणारी जाणीव इतरांपेक्षा वेगळी असते. मराठी भाषेचे जतन करणे प्रत्येक मराठी बांधवाचे कर्तव्य आहे. मराठी भाषा जोपासा व तिचा प्रसार करा असे आवाहन त्यांनी केले. 
🙏मराठी भाषा दिना निमित्ताने आयोजित सत्कार सोहळ्यात -
प्रा *चंद्रकांत* *वानखेड़े* (कवी)  *विठ्ठल* *तांबे* (पत्रकार) *राजाराणा* (लेखक ,संचालक भारतीय , नाट्य परिषद, बाल रंगभुमी साठी विशेष योगदान) ) *मंदार  पाठक * (लेखक व दिग्दर्शक), प्रशांत तपस्वी ((अभिनेता) *अंजली जाखडे *(नाट्य अभिनेत्री) , *रविंद्र ठाकूर (मॉडेल), डॉ.शिरीष शेफाल देशमुख* (शिव छत्रपती शिवाजी महाराज विशेष भुमिका अभिनेता) *मोहिनी कारंडे* (लेखिका व प्रकाशक) , पुणे बार असोसिएशन चे सेक्रेटरी *श्री. विवेक भरगुडे* यांचा विशेष सन्मान करण्यात आला. 
कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक अण्णा दांगट, नितीन वाघ, वंशिका ट्रस्ट महाराष्ट्र चे अध्यक्ष संजय नायर, दादा पोकळे, रामचंद्र पोळेकर, केतन शिंदे, सचिन पासलकर, राज पायगुडे  यांनी केले. याप्रसंगी मनीषाताई धारणे, सविता जोशी, अनिता मुनोत, शोभा बल्लाळ, सुजाता वाघ या महिला व संतोष शेलार, विष्णू गरुड, बाळकृष्ण वांजळे, गणेश राऊत, संजय जाधव, हनुमंत गायकवाड, सुनील पवार, शांताराम पढर, राजेंद्र वाघ, योगेश बनसोडे, सागर शिर्के, आकाश बालवडकर, राजेश शिंदे, युवराज पाटील, रघुवीर प्रसाद, तेजस साळुंखे, शिवानंद कोणालीकर हे उपस्थित होते. 
प्रास्ताविक अण्णा दांगट यांनी व सूत्रसंचालन गणेश राऊत यांनी आणि आभार सचिन पासलकर यांनी मानले.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*