पुणे विभागात कोरोना बाधित एकूण 586 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पुणे विभागात कोरोना बाधित एकूण 586 रुग्ण
-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर


         पुणे दि.16:- विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 586 झाली आहे. तथापी ॲक्टीव रुग्ण 468 आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली. 
            विभागात आतापर्यंत एकूण 586 कोरोना बाधित रुग्ण असून एकूण 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच एकूण 68 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. 
 पुणे जिल्हयात 531 बाधीत रुग्ण आहे तर 47 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 11 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू  झाला . सोलापूर जिल्हयात 12 बाधीत रुग्ण आढळून आले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला. सांगली 26 बाधीत रुग्ण, कोल्हापूर जिल्हयात 6 बाधीत रुग्ण आहेत.
नमुना तपासणी अहवाल
आजपर्यत  विभागामध्ये एकुण  7 हजार 289 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 6 हजार 937 चा अहवाल प्राप्त आहे. तर 386 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 6 हजार 306 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 586 नमुन्यांचा अहवाल  पॉजिटिव्ह आहे.
*विभागातील घरांचे सर्व्हेक्षण*
           आजपर्यंत विभागामधील 37 लाख 41 हजार 075 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 1 कोटी 43 लाख 58 हजार 694 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 807 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.
    आजपर्यंत विभागात एकूण 5 हजार 660 नागरिकांना निरिक्षणाखाली होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यात 4 हजार 227, सातारा जिल्ह्यात 274, सोलापूर जिल्ह्यात 991, सांगली जिल्ह्यात 167 आणि कोल्हापूर जिल्ह्यात 01 नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
*संस्थात्मक क्वारंटाईन*
आजपर्यंत विभागात एकूण 2 हजार 310 नागरिकांना निरिक्षणाखाली संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहेत. त्यापैकी पुणे जिल्ह्यात 244, सातारा जिल्ह्यात 135, सोलापूर जिल्ह्यात 653, सांगली जिल्ह्यात 81 आणि कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 197 नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे,असेही डॉ.म्हैसेकर यांनी सांगितले. 
0000