9/11 दहशतवादी हल्ल्यापेक्षाही भयानक झालीये अमेरिकेची अवस्था

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


9/11 दहशतवादी हल्ल्यापेक्षाही भयानक झालीये अमेरिकेची अवस्था
___________________________________


संपूर्ण जगाला आपल्या मगरमिठीत घेतलेल्या कोरोना व्हायरसपुढे महास्ता म्हणवला जाणारा अमेरिकाही पुरता हतबल झाला आहे. अमेरिकेत बुधवारी कोरोना व्हायरसमुळे मरणाऱ्यांचा आकडा 4,000 वर जाऊन पोहोचला. अमेरिकेतील मृतांचा हा आकडा 9/11ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्यांच्या आकड्यापेक्षाही मोठा आहे. अमेरिकेतील आरोग्य तज्ज्ञांनीतर कोरोनामुळे तेथे तब्बल 1 ते 2 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला आहे.
येथील जॉन्‍स हॉपकिन्‍स यूनिवर्सिटी कोरोना वायरस रिसोर्स सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल 4,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास 190,000 लोक संक्रमित झाले आहेत. 


अल कायदाच्या दहशतवाद्यांनी 9 नोव्हेंबर 2001 रोजी अमेरिकेवर मोठा दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात जवळपास 3,000 निष्पाप अमेरिकन नागरिकांचा जीव गेला होता. आता अमेरिकेत मरणारांची संख्या चीनपेक्षाही अधिक झाली आहे. ज्या चीनमध्ये  कोरोना व्हायरस जन्माला आला त्या चीनमध्ये आतापर्यंत 3,310 लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. तर संपूर्ण जगाचा विचार करता तब्बल 8,60,000 हून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. तर 42,000 लोकांचा यामुळे मृत्यू झला आहे.


पुढील दोन आठवडे अमेरिकेसाठी अत्यंत कठीन -


कोरोनामुळे इटली, स्पेन, अमेरिका, फ्रान्स आणि नंतर चीनमध्ये सर्वाधिक लोकांचे बळी गेले आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रमंप यांनीही मंगळवारी स्पष्ट केले, की पुढील दोन आठवडे अमेरिकेसाठी अत्यंत कठीन राहणार आहेत. त्यामुळे या संकटाचा सामना करण्यासाठी जनतेने तयार राहावे. याच बरोबर, सोशल डिस्‍टंसिंग हाच केवळ कोरोनापासून बचावाचा एकमेव मार्ग आहे, असे व्‍हाइट हाऊसमधील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.