डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक  योगदान  !

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक  योगदान  !


आजच्या दिवशी म्हणजेच  1 एप्रिल 1935 रोजी भारतीय रिझर्व बँकेची स्थापना करण्यात आली. भारत सरकार भारताची चलन व्यवस्था बदलत आहे ही चांगली गोष्ट आहे.
पण ही चलन व्यवस्था कशी असावी ह्या विषयी  डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी मार्गदर्शन केले आहे.  


1)भारताची चलन व्यवस्थेचे मार्गदर्शक.1923/1925
2)भारतीय रिजर्व बँकेच्या स्थापणेचे मार्गदर्शक.1934
3)भारताचे संविधान लेखक.1949
4)भारतीय 14 वित्त आयोगाचे दिशादर्शक.1951
– डाॅ.बाबासाहेब आंबेडकर


वरील 4 गोष्टी भारताच्या अर्थव्यवस्थेचा पाया आहेत.


आणि त्या सर्व गोष्टींचा पाया हा बाबासाहेबांचे विचार आणि लिखाण आहे.


वरील 4 गोष्टींवरती आजपर्यंतचा भारताचा अर्थ कारभार आणि येनारा भविष्यातील अर्थ कारभार अवलंबुन आहे.


1)
The problem of the rupee:Its origin and its solution.1923 – Dr.Babasaheb Ambedkar


बाबासाहेबांनी 1923 साली त्यांच्या “डाॅक्टर आॅफ सायन्स”
ह्या पदवी साठी “लंडन स्कुल ऑफ ईकोनाॅमिक्स” ह्या विश्वविद्यालयात शिकत असताना लिहलेला प्रबंध.


या आपल्या प्रबंधात डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांनी
“चलन” दर दहा वर्षानी बदलने आणि ते अचानक बदलने.
हे मुद्दे 93 वर्षापूर्वीच लिहून ठेवले आहेत.


ज्यामुळे भ्रष्टाचार आणि ब्लैकमनी रोखता येऊ शकतो असे ईशारे त्यांनी अगोदरच दिलेले आहेत.


2)
Reserve Bank Of India.1934 – Dr.Babasaheb Ambedkar


भारतीय रिझर्व बँकेची स्थापना हि ब्रिटीश काळात
Reserve Bank Of India Act 1934 साली झाली.


त्या पुर्वी 1926 साली
Royal Commission on Indian Currency and Finance, also known as the Hilton–Young Commission.
हे कमिशन भारतात रिजर्व बँकेच्या स्थापनेसाठी इग्लंड हुन भारतात आले होते.


Reserve Bank Of India.
ची संकलपणा,मार्गदर्शक तत्वे,कार्यपद्धती व दृष्टीकोण हे सर्व बाबासाहेब आंबेडकरांनी “हिल्टन यंग कमिशन” ला 1926 साली दिलेली साक्ष ह्या वरतीच आहे .
पुढे रिजर्व बँक आॅफ इंडिया ची स्थापणा 1934 साली झाली.


त्या “हिल्टन यंग कमिशन” मधील जो प्रत्येक पदाधिकारी होता त्याच्या प्रत्येकाच्या हातात बाबासाहेबांचे “The problem of the rupee its origin and its solution” हेच पुस्तक होते.


3)
“Finance Commission of India.1951
“भारतीय वित्त आयोग”


“भारतीय वित्त आयोग” ची स्थापण 1951 साली झाली.


भारतीय वित्त आयोगाचे काम हे आहे कि देशातील केंद्र आणि राज्य ह्या दोन्ही घटकांमध्ये भारत सरकारकडे येनार्या सर्व करांच्या स्वरूपातील महसुल आणि ईतर ठिकाणांहुन येनारा महसुल हा खुप मोठ्या प्रमाणात केंद्रा कडे पैश्याच्या स्वरूपातुन जमा होतो.
तर त्याचे प्रत्येक 5 वर्षांनी व्यवस्थापण करणे गरजेचे असते.


Finance Commission Of India ची स्थापण ही.
THE EVOLUTION OF PROVINCIAL FINANCE IN BRITISH INDIA.1925- Dr.Babasaheb Ambedkar


हा बाबासाहेबांचा कोलंबिया विद्यापिठा मध्ये Phd साठी चा प्रबंध आहे.
ह्या प्रबंधा च्या आधारेच भारतीय वित्त आयोगाची स्थापणा झाली आहे.आणि आज पर्यंत सर्व 14 वित्त आयोग हे त्याच पुस्तकाच्या आधारे करन्यात आले आहेत.


ही माहीती तर भारतातील अर्थतज्ञांना पण अजुन ज्ञात नाही आहे तर लोकांना ती कधी समजनार हिच मोठी शोकांतीका आहे.


बाबासाहेब हे भारतातील अर्थतज्ञांपैकी सर्वाधिक जास्त शिकलेले ते ही जगातील सर्वोच्च विद्यापीठांतुन अर्थशास्त्र ह्या विषयांत सर्वाधिक जास्त Phd केलेले एकमेव व्यक्ती आहेत.


मला आवर्जुन सांगायचे आहे कि हे सर्व लिखान त्यांनी जवळपास शंभर वर्षांपुर्वी केलेले आहे आणि त्या जमान्यात.
टि.व्ही,इंटरनेट,मोबाईल,काॅम्पुटर ह्या सोई सुविधा जन्मल्या नव्हत्या.
तरी सुद्धा बाबासाहेबांनी जगातिल सर्वाधिक सुंदर अर्थशास्त्रात लिखान केले आहे.
येणार्या कित्येक  वर्षापर्यंत ह्या लिखाणाला महत्व असेल..
*सरकार कितीही बदलतील पण त्या सरकारचे मार्गदर्शक हे डाॅ.बाबासाहेब आंबेडकरच असतील* यात अजिबात  शंका नाही .
*आधुनिक  भारताच्या नवनिर्मात्याला  विनम्र अभिवादन !!*