गरजू नागरिकांना किराणामाल अन्न धन्य जनशक्ती विकास संघाच्यावतीने जनशक्ती विकास संघाच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्षा प्रणिता राठी आणि इतर मान्यवराच्या उपस्थित

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 






कोरोनाचे संकट ओढावल्याने हातावरचे पोट असणार्‍या कुटुंबांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.मार्केट यार्ड मध्ये गेट क्रं एक येथे व डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथील गरजू नागरिकांना किराणामाल अन्न धन्य जनशक्ती विकास संघाच्यावतीने जनशक्ती विकास संघाच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्षा प्रणिता राठी व महाराष्ट्र प्रदेश युवा प्रदेशाध्यक्ष सुफियान खान व जनशक्ती विकास संघाच्या व्यापारी आघाडीच्या अध्यक्षा बबिता खान यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यासाठी जनशक्ती विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष सोफी आसिफ , पर्वती विधानसभा अध्यक्ष फय्याज बागवान व अन्य कार्यकर्ते पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.या मदतीमध्ये तांदूळ , गहू , तेल , साखर , मीठ व संरक्षनासाठी मास्क देण्यात आले .