पत्रकार संरक्षण समिती* ची  *पत्रकारांसाठी अतिशय महत्वाची मागणी*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*पत्रकार संरक्षण समिती* ची  *पत्रकारांसाठी अतिशय महत्वाची मागणी*



*कर्त्यव्यावर असताना लॉकडाऊन दरम्यान पत्रकाराचा मृत्यू झाल्यास 1 कोटींची मदत देण्याची मागणी*


 


प्रति,
उद्धव ठाकरे ,
मा. मुख्यमंत्री साहेब,
महाराष्ट्र राज्य,


 


विषय- कर्तव्यावर असताना  कोव्हिडं 19 (करोना) मध्ये  पत्रकाराचा मृत्यू झाल्यास एक कोटींची मदत मिळणेबाबत...


 



माननीय मुख्यमंत्री साहेब,



आपण जाणताच की पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. जगभर कोरोना व्हायरस ने धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रात देखील कोरोना व्हायरस ने जास्त नागरिक पीडित आहेत. तसेच संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात लॉकडाऊन आहे आणि नागरिक आप आपल्या घरांमध्ये लॉक डाऊन आहेत. अशा वेळी डॉकटर, नर्सेस, मेडिकल स्टाफ तसेच पत्रकार हे आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य करत आहेत. प्रिंट मीडिया , इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि वेब न्यूज चे पत्रकार आपला जीव धोक्यात घालून नागरिकांपर्यंत बातम्या ,इतर महत्वाची माहिती ,शासकीय माहिती नागरिकपर्यंत पोहोचवीत आहेत. मेडिकल स्टाफ ला सरकारने मदत जाहीर केली असून पत्रकारांना कुठल्याही प्रकारची मदत जाहीर केलेली नाही. अशा वेळी कोरोना व्हायरस ने काही झाल्यास प्रिंट मीडिया , इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि वेब न्यूज मधील सरसकट सर्व पत्रकारांना एक कोटींची मदत देण्यात यावी ही नम्र विनंती....


 


 


*विनोद पत्रे*


*अध्यक्ष, पत्रकार संरक्षण समिती*


 


 


*अनिल चौधरी*


सचिव, पत्रकार संरक्षण समिती