पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*उरुळी कांचन ग्रामपंचायत व पत्रकार यांच्या मुळे पुणे जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखल*
जीवनावश्यक वस्तू बाजार मूल्य भावापेक्षा अधिक भावाने विक्री केल्याने उरळीकांचन येथे एका व्यापार्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश लाँक डाऊन केला .यावेळी पंतप्रधान ,मुख्यमंत्री ,जिल्ह्याधिकारी , तहसीलदार, ग्रामपंचायत यांनी जीवनावश्यक गोष्टींचा काळाबाजार न करण्याचे आवाहन केले होते .पण अनेक गावात हा काळाबाजार सुरू असुन उरुळी कांचन येथील प्रकारामध्ये सकाळी नुसतीच नोटीस देऊन सोडण्यात आले . पण पत्रकार यांनी कारवाईचा हा फार्स कशासाठी असे लिहीताच व ग्रामपंचायतीने तलाठी बदलीची जोरदार मागणी उपमुख्यमंत्री
अजितदादा पवार यांच्या कडे केली .असता लगेच गुन्हा दाखल करण्यात आला आहे .असाच प्रकार लोणी काळभोर येथे घडला असता पोलीस प्रशासनाने कार्यवाहीची अपेक्षा ठेवली असताना सुद्धा वरिष्ठांच्या आदेशावरुन महसूल विभागाने नुसतीच नोटीस देऊन सोडण्यात आले . मग एका गावात एक न्याय व दुसऱ्या गावात एक न्याय हे कसे ?