तृप्ती देसाई यांची फेक न्यूज व्हायरल

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*🔴तृप्ती देसाई यांची फेक न्यूज व्हायरल🔴*-
*मुख्यमंत्र्यांनी" महाराष्ट्रात दारूबंदी करावी" यासाठी देवेंद्रजी फडणवीस जेव्हा हा जनादेशयात्रा करीत होते तेव्हा त्यांचा पुण्यात दौरा असताना "दारूबंदी करा" यासाठी मी दारूच्या बाटल्यांचा हार मुख्यमंत्र्यांना घालायला निघाले असताना मला त्यावेळी राहत्या घरातून पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ताब्यात घेतले होते....*
*महाराष्ट्रात दारूबंदी झाली पाहिजे यासाठी गेले तीन वर्ष मी काम करीत आहे आणि दारूबंदीसाठी केलेल्या आंदोलनाचा जुना व्हिडिओ व्हायरल करून "सदर व्हिडिओ मध्ये तृप्ती देसाईना लॉकडाऊनमध्ये दारू घेताना पकडले "असे खोटे पसरवून काही इसम मला बदनाम करण्याचा प्रयत्न  करत आहेत. सायबर क्राईमने तातडीने या सर्वांवर कारवाई करावी, ही नम्र विनंती*.
*हा व्हिडिओ टाकून खोटा मजकूर लिहून माझी बदनामी करण्याची सुरुवात फेसबुकवर नाशिकच्या गोरक्षनाथ गवळी याने सुरू केली आणि ती पोस्ट अनेक फेसबुक ग्रुपवर आणि व्हाट्सअप ग्रुपवर  व्हायरल होत आहे.*
*आपल्याला सर्व फेसबूक अकाउंटवरच्या पोस्ट शेअर करून बदनामी केलेल्या प्रोफाईल लिंक पाठवत आहे*
*एखाद्या सामाजिक काम करणाऱ्या दारूबंदीसाठी लढणाऱ्या महिलेची किती बदनामी करायची, याला पण एक मर्यादा आहे..ती  आज खालच्या पातळीवर जाऊन सोशल मीडियावरील लोकांनी ओलांडली-तृप्ती देसाई (संस्थापक अध्यक्ष भूमाता ब्रिगेड)*