पुणे प्रवाह न्युज पोर्टल
माथेरानचा पायथा दोन दिवस जळत आहे....
झाडे तोडण्यासाठी वणवे लावले जात असल्याचा आरोप
कर्जत,ता.11 गणेश पवार
माथेरान हे पर्यटन स्थळ ज्या डोंगरावर उभे आहे, त्या डोंगराचा पायथा मागील दोन दिवस वनव्यांनी जळत आहे.झाडे तोडण्यासाठी आणि वन्यजीव यांची शिकार करण्यासाठी वणवे लावले जात असल्याचा आरोप केला जात आहे.दरम्यान,दोन दिवसात नेरळ च्या मागे असलेले डोंगर जळून काळे झाले आहेत.
वणवे ही समस्या बनली असून मागील काही वर्षात लागलेले वणवे हे निसर्ग निर्मित नसल्याचे दिसून आले आहे.त्यात जंगलातील जळालेली झाडे तोडण्यासाठी आणि वन्यजीव यांची शिकार करण्यासाठी वणवे लावले जात असल्याचे निष्पन्न झाले आहे.त्यात सगुणा वन संवर्धन तंत्राच्या माध्यमातून मागील काही वर्षात वणवे लागू नयेत यासाठी जंगलात पट्टे मारण्याचे,जंगली झाडे लावण्याचे काम केले आहे.त्या भागात वणवे लागले नसल्याचे दिसून येत आहे,मात्र ज्या भागात जंगलात जंगल पट्टे मारले गेले नाहीत.अशा ठिकाणी जंगलात वणवे लागत आहेत.त्यामुळे ते मानवी वणवे असल्याचे सिद्ध होत असून मागील दोन दिवस नेरळ-माथेरान घाट रस्त्यात वणवे लागले आहेत.रात्रीच्या वेळ साधून हे वणवे दोन्ही दिवस लागले असून सकाळी त्या वणवे लागलेल्या भागात जंगलातील अर्धवट जळालेली झाडे तोडण्यासाठी अनेक महिला दिसून येत आहेत.
बुधवार 8 एप्रिल आणि गुरुवार 9 एप्रिल या दोन्ही दिवस नेरळ-माथेरान घाट रस्त्याच्या वणवे लागले आहेत.लव्हाळवाडीच्या मागे असलेल्या जंगलात आणि मागे असलेल्या जुम्मापट्टी गावच्या मागे असलेल्या जंगलात दोन्ही दिवस वणवे लागले आहेत.त्यानंतर स्थानिक आदिवासी लोक आणि वन विभागाचे कर्मचारी हे लॉक डाऊन असताना देखील वणवे विझविण्याचे काम करीत होते.त्यात त्यांना संयुक्त वन व्यवस्थापन समिती मदत करताना दिसत होते.परंतु लागलेले वणवे हे सायंकाळनंतर वातावरणात सुरू होणारे वाऱ्याचे झुरके यामुळे विझत नाही आणि त्या भागातील डोंगर जळून खाक होतात.रात्री लागलेला वणवे हा रात्रभर झुमसत होता आणि जुम्मापट्टी स्टेशनच्या समोरच्या भागातील डोंगर तेथील गवत जळून गेल्याने काळे झाले आहेत.