पुणे प्रवाह न्युज पोर्टल
तालुक्यातील वारे हऱ्याचीवाडीला पोहचले पाणी...
14 लाख खर्चून नळपाणी पुरवठा योजना कार्यन्वित
कर्जत,ता.4 गणेश पवार
कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत मधील दुर्गम भागात असलेल्या हऱ्याची वाडी मध्ये पाणीटंचाई जाणवत असते.तेथील आदिवासी लोकांना पाणी नेण्यासाठी डोंगर उतरून पायथ्याशी यावे लागत होते,मात्र आदिवासी विकास विभागाने नळपाणी योजना तयार केल्याने तेथील आदिवासी लोकांचे हाल आता या वर्षी पासून उन्हाळ्यात थांबणार आहेत.
अदिवासी पेण प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी उपयोजनेअंतर्गत 14 लाख रुपये मंजुर करण्यात आली आहे,त्या योजनेमधून कर्जत तालुक्यातील वारे हऱ्याची वाडी येथे वाडीच्या पायथ्याशी असलेल्या विहरीवर पंप बसवून पाईपलाईन द्वारे पाणी वस्तीवर पोहचवले तसेच वाडीत एक साठवण टाकी ही बांधण्यात आली असून टाकीत साठविलेले पाणी वाडीत तीन चार ठिकाणी सार्वजनिक स्टँडपोस्ट बसवून पाणी सर्वांपर्यंत पोहचविण्यात आले आहे त्यामुळे आदिवासींची पाण्यासाठीची वणवण थांबणार आहे.
कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील दुर्गम भागात डोंगरावर वसलेल्या हऱ्याची वाडीत सुमारे 200 लोकसंख्या असलेल्या आदिवासी बांधवांची वस्ती आहे.पाणी योजना नसल्याने महिलांना अनेक वर्षांपासून पाण्यासाठी दाहीदिशा पायपीट करावी लागत होती. ग्रामस्थांकडून पाणी टंचाई समस्या निवारणासाठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला गेला.त्याची दखल महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाने घेऊन या वाडीच्या नळपाणी पुरवठा योजने साठी सुमारे 14 लाख इतका निधी सहा महिन्यापूर्वी मंजूर केला होता.ठेकेदाराने काम सुरू करून वेळेत पूर्ण केल्याने या वर्षी हऱ्याची वाडी ग्रामस्थांची पाणी टंचाई ची चिंता मिटली आहे.वर्षोनुवर्षे महिलांची मैलोनमैल होणारी पायपीट थांबल्याने ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहेत.
मोल मजुरी करायला जायला जमत नव्हते,मात्र पाणी समस्या सुटल्याने हऱ्याची वाडी मधील ग्रामस्थ आनंदी झाले आहेत