पुणे विभागात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजने अंतर्गत 20 लाख 37 हजार 35 कुटुंबांना लाभ*  - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*पुणे विभागात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजने अंतर्गत 20 लाख 37 हजार 35 कुटुंबांना लाभ*
 - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
             पुणे, दि. 14 – पुणे विभागात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजने अंतर्गत 20 लाख 37 हजार 35 कुटुंबांना गहू, साखर, तूरडाळ व चणाडाळीचे वाटप करण्यात आल्याची  माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
 डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात अंत्योदर व प्राधान्य कुटुंब लाभार्थी  योजना गतीने राबविण्यात येत आहेत. पुणे विभागातील 27 लाख 21 हजार 242 शिधापत्रिकाधारक कुटुंबापैकी  20 लाख 37 हजार 35 कुटुंबाला गहू, साखर, तूरडाळ, चणाडाळ तसेच तांदुळाचे 18728.81 क्विंटल इतके वितरण करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.