आषाढी वारीसाठी निघणारी दिंडी किंवा पालखी  प्रयाणासाठी शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक   - उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


आषाढी वारीसाठी निघणारी दिंडी किंवा पालखी 
प्रयाणासाठी शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक 
 - उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे, 15- आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे दिंडी किंवा पालखी प्रयाणासाठी शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक 
असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले.
            विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला आमदार सुनील शेळके,माजी आमदार उल्हास पवार, विभागीय आयुक्त  डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सदस्य सचिव सल्लागार विठ्ठल जोशी, देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधूकर महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड विकास ढगे पाटील, राजाभाऊ चोपदार, योगेश देसाई, अभय टिळक, विशाल मोरे, संतोष मोरे, सोपानदेव देवस्थानचे विश्वस्त तथा अध्यक्ष गोपाळ गोसावी, मनोज रणवरे, श्रीकांत गोसावी आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले, राज्याच्या विविध भागातून आषाढी वारीसाठी दिंडया निघतात, दिंडी किंवा पालखी प्रयाणासाठी शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक आहे, शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय दिंडी, पालखी पंढरपूरकडे प्रयाण करणार नाही, असेही श्री पवार यांनी स्पष्ट केले.