पुणे प्रवाह न्युज पोर्टल
प्रेस नोट
*महाराष्ट्र जोशी समाज संघटनेकडून शिधा वाटप*
पुणे :
कोरोना विषाणू साथीच्या संकटात रोजगार हरवलेल्या, पुणे जिल्हयातील हातावर पोट असणाऱ्या जोशी समाज बांधवांना
महाराष्ट्र जोशी समाज संघटनेकडून शिधा वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र जोशी समाज संघटनेचे उपाध्यक्ष निलेश प्रकाश निकम यांच्या हस्ते पुणे शहर, जेजुरी, सासवड, दौंड, इंदापूर, उरळी कांचन, पिंपरी चिंचवड येथील समाजातील ७ हजार ८०० गरीब समाज बांधवांना शिधा वाटप करण्यात आले. निलेश प्रकाश निकम यांनी दिलेल्या देणगीतून शिधा वाटप करण्यात आले.
कैलास हेंद्रे (अध्यक्ष, महाराष्ट्र जोशी समाज संघटना), रामदास निकम, तानाजी सुर्वे, गणेश जोशी, संदीप निकम, संजय जोशी, सौ.शुभांगी हेंद्रे, सौ सविता खेडेकर, सुजित हांडे, कुणाल हेंद्रे, संकेत जोशी उपस्थित होते.
................................................