शिरूर तालुक्यातून आज मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मधील १०५३ कामगारांना वैद्यकीय तपासणी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पुणे, दि.१२- शिरूर तालुक्यातून आज मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मधील १०५३ कामगारांना वैद्यकीय तपासणी करून  ३६ एसटी. बसेसमधून  सीमेपर्यंत  रवाना करण्यात आल्याची माहिती पुण्याचे उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिली.
   पुणे जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परराज्यातील मजूर, कामगार यांना सीमेपर्यंत सोडण्याचा शासनाने निर्णय घेतला.
त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.
 पुण्याचे उप विभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख आणि तहसिलदार यांनी पायी जाणाऱ्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील मजुरांना बससेवा उपलब्ध करून दिली. या नागरिकांना फूड पॅकेट देवून
रवाना करण्यात आले. तत्पूर्वी सोशल डिस्टन्सिगचे पालन, आरोग्य तपासणी, मास्कचा वापर या सर्व बाबींची अंमलबजावणी
 करण्यात आली.