संघर्ष सोशल फौंडेशनतर्फे परप्रांतीय मजुरांसाठी मदतकार्य* 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


press note                                                                                                                                   *संघर्ष सोशल फौंडेशनतर्फे परप्रांतीय मजुरांसाठी मदतकार्य*


पुणे :- 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने विविध राज्यात अडकून पडलेल्या मजुरांना पुन्हा त्यांच्या गावी जाण्यासाठी विशेष श्रमिक ट्रेन सुरु केल्या आहेत. त्याकरिता मजुरांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पासेस काढावे लागत आहेत व तिथे गर्दी होऊन सोशल डिस्टंसिन्गचा फज्जा उडत असल्याने संघर्ष सोशल फौंडेशनतर्फे मजुरांच्या सोयीकरिता डिजिटल पास साठी   अर्ज करण्यास मदत करण्यात येत आहे. 


डिजिटल पासच्या माध्यमातून मजुरांचे आधार कार्ड , मेडिकल सर्टिफिकेट व अन्य कागदपत्रे अपलोड करून दिली जात आहेत. तसेच मजुरांना यासाठी आवश्यक असलेला आरोग्य दाखला देखील मोफत आरोग्य तपासणी करून दिला जात आहे. संघर्ष सोशल फौंडेशनचे अध्यक्ष चैतन्य  पुरंदरे व डॉ. हिरेन निरगुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली  रणजित शिंदे, प्रणव ढवळे , प्रसाद केळकर, सार्थक खिरे आदी कार्यकर्ते या उपक्रमासाठी मदत करीत आहेत. मोफत मेडिकल चेकअप साठी डॉ. हिरेन निरगुडकर यांचे  विशेष सहकार्य लाभत आहे.                                                                  -------------------------------------------