पुणे प्रवाह न्युज पोर्टल
कर्जत तालुक्यात कुपोषित बालकांची संख्या वाढली,संख्या पावणेदोनशेच्या जवळ
कर्जत,ता.12 गणेश पवार कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि ग्रामीण तसेच दुर्गम भागात कुपोषण वाढले आहे.कुपोषण वाढण्यासाठी पिण्याचे पाण्याची टंचाई आणि तीव्र उन्हाळा हा महत्वाचा दुवा असतो. या दोन्ही बाबी यामुळे कर्जत तालुक्यातील कुपोषित बालकांची संख्या वाढली असून अतितीव्र म्हणजे सॅम श्रेणीमधील बालके यांची संख्या हि 29 तर तीव्र कुपोषित श्रेणीमधील बालके यांची संख्या तब्बल 140 वर पोहचली आहे. हि आकडेवारी कर्जत तालुक्यातील आदिवासी भागातील कुपोषणासाठी धोक्याची आहे. आज कर्जत तालुक्यातील एकात्मिक बालविकासच्या दोन प्रकल्पात मिळून अतितीव्र कुपोषित म्हणजे सॅम श्रेणीतील बालकांची संख्या 29 इतकी असून तीव्र कुपोषित म्हणजे मॅम श्रेणीमधील कुपोषित बालकांची संख्या हि तब्बल 140 एवढी प्रचंड आहेत.तर कुपोषणाच्या उंबरठ्यावर असलेल्या अंगणवाडी मध्ये पोषण आहार घेण्यासाठी येत असलेल्या कुपोषित बालकांची संख्या 1080 एवढी आहे. हि सर्व माहिती एकात्मिक विभागाने रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी घेतलेल्या आढाव बैठकीत समोर आली आहे. त्याचवेळी उंची कमी आणि वजन देखील अशी बालके कुपोषणात दुर्धर बालके यांचा समावेश असून त्यांना देखील त्यांच्या कुपोषणाने मोठ्या संख्येने वाढ होताना दिसत असून हि बाब कर्जत तालुक्यासाठी धोका दायक आहे.साधारण पावणे दोनशे बालके ही अतितीव्र आणि तीव्र कुपोषित बालके कर्जत तालुक्यातील कुपोषण किती वाढले आहे,त्याचे चित्र स्पष्ट करणारी आहे. कर्जत तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्या आरोग्य केंद्रापैकी खंडास,कळंब,आंबिवली या तीन ठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वाधिक आदिवासी बहुल भाग आहे. त्यानंतर काही प्रमाणात नेरळ,मोहाली आणि कडाव या प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थिती आहे. तेथिल आदिवासी यांचे जीवनमान उंचवावे म्हणून काम करीत असलेल्या आदिवासी उपयोजना करून देखील उपाययोजना प्रामुख्याने आदिवासी भागात होत असतात.पण तरी देखील आदिवासी भागातील आणि कर्जतच्या अन्य भागातील कुपोषण काही कमी होताना दिसत नाही. तालुक्यात अंगणवाडी शाळा मोठ्या प्रमाणात असून एकात्मिक बालकल्याण विभागाचे दोन विभाग कार्यरत आहेत.त्यात चारशे हुन अधिक अंगणवाडी मध्ये किमान 20 हजार बालके पोषण आहार घेण्यासाठी येतात. त्यांना अंगणवाडी मध्ये काही शिकविण्यासाठी आणि पोषण आहाराचे वाटप करण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस काम करता.त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुक्यात तीस पर्यवेक्षिका काम करतात. त्याचवेळी विसार अधिकारी आणि नंतर दोन प्रकल्प अधिकारी तसेच दिमतीला आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी,आरोग्य कर्मचारी असताना देखील कुपोषणमुक्त तालुका काही होत नाही.
डॉ सी के मोरे - तालुका आरोग्य अधिकारी,कर्जत
कर्जत तालुका आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो आणि या तालुक्यातील आदिवासी लोक कामधंदा मिळविण्यासाठी गावाबाहेर पडतात,त्यावेळी रोजगार मिळावा म्हणून आपल्या लहान बालकांकडे दुर्ल्सखा होते. त्यामुळे प्रामुख्याने फेब्रुवारी ते मे या कालावधीत कुपोषण वाढतं दिसून येते. मात्र आम्ही प्रत्येक कुपोषित बालकांपर्यंत पोहचत असून त्यांची आरोग्य तपासणी करून औषध उपचार करीत आहेत. तरी देखील कुपसोहन वाढले तर शासनाला आम्ही सूचना करून कुपोषित बालकांसाठी बाळ उपचार केंद्र सुरु करण्याची सूचना केली आहे.
अशोक जंगले- दिशा केंद्र सामाजिकी संस्था
कर्जत तालुक्याची भौगोलिक रचना लक्षात घेता आम्ही या ठिकाणी असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात कायम बाळ उपचार केंद्र सुरु राहावे अशी मागणी केली आहे. आमची सतत या मागणीचा पाठपुरावा करीत असतो,मात्र शासन त्यासाठी फारसे गंभीर नाही असे दिसून येत आहे. परंतु कुपोषित बालकाबद्दल एका दुर्घटना घडली कि संबंधित यंत्रणा धावपळ करायला लागते.