पुणे प्रवाह न्युज पोर्टल
प्राजक्ता माळी तिच्या योगा गुरू रीमा वेंगुर्लेकरसोबत योगदिनी घालणार 108 सुर्यनमस्कार !!
सेलिब्रिटी फिटनेस इन्स्ट्रक्टर रीमा वेंगुर्लेकर आंतरराष्ट्रीय योगा दिवस आपल्या स्टुडंट्ससोबत 108 सुर्यनमस्कार घालून साजरा करणार आहे. कोरोना व्हायसरच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा सहावा योग दिवस हा व्हर्च्युअली साजरा होणार असल्याने ‘घरीच आणि घरच्यांसोबत योगा ’ ह्या थीमनूसार योगा दिवस साजरा होणार आहे. त्यामुळेच रीमाने सर्वांना व्हर्च्युअली एकत्र आणून योगा करण्याचा निर्णय घेतला आहे.
अष्टांग योगा शिकवणा-या रीमा वेंगुर्लेकरकडे अनेक मराठी सेलिब्रिटीही योगा शकायला येतात. अमृता खानविलकर, सुव्रत जोशी, प्राजक्ता माळी, सिध्दार्थ मेनन, सायली संजीव, संजय जाधव, ऋता दुर्गुळे असे मराठी सिनेसृष्टीतील अनेक तारे-तारका तिचे शिष्य आहेत. ह्या सेलेब्स पैकी प्राजक्ता माळीने आपल्या योगा गुरू सोबत योगदिनी ह्या अनोख्या उपक्रमात सामिल व्हायचे ठरवले आहे.
योगा इन्स्ट्रक्टर रीमा वेंगुर्लेकर म्हणते, “अष्टांग योगामधला तुम्हांला सर्वाधिक लाभ देणारा व्यायामप्रकार म्हणजे सुर्यनमस्कार. सुर्यनमस्कार करणं हे बाकी योगाप्रकारापेक्षा सोप असतं. नियमीत योगा न करणारे ही हा व्यायाम करू शकतात. त्यामुळे सकाळी 8 वाजता आम्ही 108 सुर्यनमस्कार घालायला सुरूवात करू. “
रीमा वेंगुर्लेकरचे हे व्हर्च्युअल सेशन्स सर्वांसाठी विनामुल्य खूलं आहे. रजिस्ट्रेशनसाठी फक्त तिच्या yogawithreema ह्या इन्स्टा हँडलवर संपर्क साधायचा आहे.