गोळवलकर गुरुजी विद्यालयात गणेश मंडळातर्फे निर्जंतुकीकरण सदाशिव पेठेतील खजिना विहीर तरुण मंडळाचा पुढाकार 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


गोळवलकर गुरुजी विद्यालयात गणेश मंडळातर्फे निर्जंतुकीकरण-



 


पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी स्वच्छतेची काळजी घेतली जात आहे. सदाशिव पेठेतील खजिना विहीर तरुण मंडळाने देखील पुढाकार घेत टिळक रस्त्यावरील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात फवारणी करीत निर्जंतुकीकरण केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त खजिना विहीर मंडळाचे अध्यक्ष ओम कासार आणि मित्र परिवाराने याचे आयोजन केले. 


 


नागरिकांच्या सुरक्षेततेसाठी अहोरात्र झटणा-या पोलीस बांधवांनी सुद्धा स्वत:ची काळजी घेणे महत्वाचे आहे. याकरीता देखील फरासखाना पोलीस स्टेशन, विश्रामबाग पोलीस स्टेशन, विमान नगर पोलीस स्टेशन, स्वारगेट वाहतूक विभाग, हडपसर वाहतूक विभाग या ठिकाणी सॅनिटायझेर डिस्पेनसेस स्टँड व सॅनिटायझर भेट म्हणून देण्यात आले.