व्हर्चुअल शिक्षणाकरिता २००० पेक्षा जास्त शाळांद्वारे ‘नेक्स्ट लर्निंग’चा वापर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


मुंबई, १२जून २०२०: नेक्स्ट एज्युकेशन इंडिया प्रा.लि, के-१२ शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य व्यासपीठ ‘नेक्स्ट लर्निंग प्लॅटफॉर्म’ द्वारे शाळांना शिकण्या-शिकवण्याचा दृष्टीकोन नव्याने तयार करण्यास सक्षम करत आहे. रिमोट लर्निंग, शैक्षणिक आणि प्रशासकीय प्रक्रिया विना अडथळा पार पाडण्यासाठी याद्वारे एकिकृत सुविधा प्रदान केली जाते. शैक्षणिक आणि प्रशासकीय प्रक्रिया अखंड सुरु ठेवण्यासाठी भारतातील २०००+ शाळांनी हे सोल्यूशन स्वीकारले आहे.


 


सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये नेक्स्ट एज्युकेशनने नेक्स्ट लर्निंग प्लॅटफॉर्मवर लाइव्ह लेक्चरची सुविधा समाविष्ट केली आहे. यातील सर्वसमावेशक सुविधांद्वारे शाळांना त्यांची अध्यापन पद्धती ऑफलाइनवरून ऑनलाइन शिक्षण प्रणालीत बदलणे शक्य झाले आहे. तसेच शिक्षकांना त्यांची ध्येयधोरणे अंगीकृत करण्यासाठी मदत करते. जेणेकरून विद्यार्थ्यांचा ऑनलाइन शिकण्याचा अनुभव वृद्धींगत होईल. यासाठी पुरस्कार प्राप्त डिजिटल कंटेंट, ऑनलाइन असाइनमेंट्स, पर्सनलाइज्ड असेसमेंट्स आणि तत्काळ प्रतिसाद व मूल्यांकनाची सुविधा पुरवली जाते. या प्लॅटफॉर्मचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे, याद्वारे घरातच शाळेसारखे वातावरण निर्माण केले जाते. तसेच शिक्षकांनाही त्यांच्या घरून सहजपणे शैक्षणिक प्रक्रियेची निगराणी आणि नियंत्रण करण्यास सक्षम बनवले जाते.


 


नेक्स्ट एज्युकेशनचे सहसंस्थापक आणि सीईओ श्री बिस देव रल्हान म्हणाले, ‘हे संकट विनाशकारी असले तरी यामुळे शाळा तंत्रज्ञानदृष्ट्या अत्याधुनिक होत आहेत. अनेक शाळांना ऑफलाइनवरून ऑनलाइन शिक्षण पद्धतीत बदलाची ही प्रक्रिया आव्हानात्मक वाटत असणार यात शंका नाही. मात्र नेक्स्ट लर्निंग प्लॅटफॉर्मसोबत हे काम सहजपणे तत्काळ साध्य कता येईल.नेक्स्ट लर्निंग प्लॅटफॉर्मचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्वीकार आणि देशभरातील शाळांचा सकारात्मक प्रतिसाद आमच्यासाठी आनंददायी आहे. तसेच घरात राहूनही शिक्षण जास्तीत जास्त उत्पादक बनवण्यासाठी शाळांनी ई लर्निंग टूल्सकडे वळणे अत्यावश्यक आहे. लागू करण्यास सोपे आणि यूझर फ्रेंडली इंटरफेस असलेल्या नेक्स्ट लर्निंग प्लॅटफॉर्मने कोणत्याही अडचणीविना दर्जेदार शिक्षण मिळवणे सोपे केले आहे.”